दिवसभर नाही सूर्यदर्शन! शहरावर ‘ओखी’ वादळाचा परिणाम दिवसभर आभाळ आणि पावसाची रिमझिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 12:46 AM2017-12-06T00:46:52+5:302017-12-06T00:50:56+5:30

नाशिक : दक्षिण किनारपट्टीवरून पुढे सरकलेले ओखी चक्रीवादळ मंगळवारी (दि.५) गुजरातला धडकल्याने वादळाचा प्रभाव मुंबईसह नाशिकवरही मोठ्या प्रमाणात जाणवला. दिवसभर शहरावर मळभ दाटून आल्याने नाशिककरांना भास्कराचे दर्शन तर घडलेच नाही; मात्र रिमझिम पाऊस अन् थंड वाºयामुळे वातावरणातील गारठ्याने संपूर्ण दिवस हुडहुडीचा सामना करावा लागला.

No sunlight throughout the day! The effect of 'Oki' storm on the city is cloudy and rainy throughout the day | दिवसभर नाही सूर्यदर्शन! शहरावर ‘ओखी’ वादळाचा परिणाम दिवसभर आभाळ आणि पावसाची रिमझिम

दिवसभर नाही सूर्यदर्शन! शहरावर ‘ओखी’ वादळाचा परिणाम दिवसभर आभाळ आणि पावसाची रिमझिम

Next
ठळक मुद्देशहरावर ‘ओखी’ वादळाचा परिणाम दिवसभर आभाळ दिवसभर नाही सूर्यदर्शन : दिवसभर आभाळ आणि पावसाची रिमझिम

नाशिक : दक्षिण किनारपट्टीवरून पुढे सरकलेले ओखी चक्रीवादळ मंगळवारी (दि.५) गुजरातला धडकल्याने वादळाचा प्रभाव मुंबईसह नाशिकवरही मोठ्या प्रमाणात जाणवला. दिवसभर शहरावर मळभ दाटून आल्याने नाशिककरांना भास्कराचे दर्शन तर घडलेच नाही; मात्र रिमझिम पाऊस अन् थंड वाºयामुळे वातावरणातील गारठ्याने संपूर्ण दिवस हुडहुडीचा सामना करावा लागला.
गेल्या तीन दिवसांपासून नाशिकच्या किमान तपमानात सातत्याने वाढ होत असून, १४ वरून पारा थेट १७ अंशांच्या पुढे गेला आहे. मंगळवारी १७.७ अंश इतके किमान तपमान शहरात नोंदविले गेले. एकूणच किमान तपमानात वाढ होत असली तरी नाशिककर मंगळवारी पहाटेपासूनच गारठले होते. ओखी वादळामुळे नाशिकमध्ये पहाटेपासून रिमझिम पाऊस सुरू होता. तसेच हवेत प्रचंड गारवाही निर्माण झाला होता.
दक्षिण भारताच्या किनारपट्टीवरून पुढे सरक त ओखी वादळ गुजरातमध्ये पोहोचले आहे. यामुळे महाराष्टÑातील अहमदनगर, नाशिक, जळगाव, पालघर, ठाणे, नंदुरबार आदी जिल्हे प्रभावित झाले आहेत. या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी पहाटेपासूनच वातावरणात कमालीचा बदल झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. यामुळे शहराचे जनजीवन प्रभावित झाले आहे. नाशिककरांना रेनकोटसह उबदार कपड्यांचाही वापर करावा लागला. दैनंदिन कामासाठी बाहेर पडलेल्या चाकरमान्यांचे हाल झाले. उबदार कपड्यांवर रेनकोट परिधान करून दुचाकीवरून महिला-पुरुष नोकरदार वर्ग कार्यालयांमध्ये मार्गस्थ होताना दिसून आले. एकूणच १७ अंशांच्या पुढे किमान तपमानाचा पारा असतानाही मंगळवारी नाशिककरांनी दिवसभर कडाक्याची थंडी अनुभवली.

Web Title: No sunlight throughout the day! The effect of 'Oki' storm on the city is cloudy and rainy throughout the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक