‘नॉस्टॅल्जिया’ सुरेल गीतांनी नाशिककरांची संध्या स्वरमयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 01:07 AM2018-03-11T01:07:22+5:302018-03-11T01:07:22+5:30
नाशिक : ‘अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनांत’, यांसारख्या काव्यरचना, चित्रपटगीते, भावगीते व भक्तिगीतांच्या सुरेल सादरीकरणाने नाशिककरांची संध्याकाळ स्वरमयी झाली.
नाशिक : ‘अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनांत’, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ अशा शौयगीतांसह ‘जीर्ण पाचोळा पडे तो उदास’ यांसारख्या लोकप्रिय काव्यरचना, चित्रपटगीते, भावगीते व भक्तिगीतांच्या सुरेल सादरीकरणाने नाशिककरांची संध्याकाळ स्वरमयी झाली.
कुसुमाग्रज स्मारकात कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती उत्सवानिमित्त सुरू असलेल्या ‘कुसुमाग्रज स्मरण’ सोहळ्यात ‘नॉस्टॅल्जिया’ कार्यक्रमात मुकुंद फणसळकर यांच्या विविध नव्या-जुन्या चित्रपटगीतांसह भावगीते व भक्तिगीतांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले. यावेळी त्यांनी ‘चांद फिर निकला, मगर तुम ना आयें, जला फिर मेरा दिल, करू क्या मैं हाय’, ‘जलते हैं जिसके लिये, तेरी आँखों के दिये, ढूँढ लाया हूँ वही यासारख्या गीतांचेही सादरीकरण केले. सहगायिका रागिनी कामतीकर यांनी त्यांना साथ दिली. संगीतसाथ आनंद अत्रे, अनिल धुमाळ, अमोल पाळेकर यांनी केली.