मालेगाव : कोरोनाबाधीत देशातून शहर व तालुक्यात आलेल्या प्रवाशांची संख्या ४६ झाली आहे. होम क्वॉरंटाईन असलेले चौघे जण शहरात फिरताना आढळून आल्याने महापालिका प्रशासनाने चौघा प्रवाशांना नोटीस बजावली आहे. शुक्रवार पासून शहरातील मॉल्स, मंगलकार्यालये, पानटपऱ्या, गर्दीचे ठिकाण बंद करण्यात आले आहे. यासाठी पोलीस, महसुल व मनपाने प्रभागनिहाय चार पथके नियुक्त केले असून एका पथकात सहा जणांचा समावेश आहे. गर्दी करणाऱ्यांवर या पथकाकडून कारवाई केली जात असल्याची माहिती प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसिलदार चंद्रजित राजपूत, मनपा आयुक्त किशोर बोर्डे, अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.दरम्यान कृषीमंत्री दादा भुसे यांनी कोरोनाशी लढण्यासाठी प्रशासनाला राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या रविवारी घराबाहेर पडू नका या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, देश एक संघ राहण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करणे गरजेचे आहे. नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
मालेगावला कोरोनाबाधीत देशातून आलेल्या चौघांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 3:47 PM
देशातून शहर व तालुक्यात आलेल्या प्रवाशांची संख्या ४६
ठळक मुद्दे पोलीस, महसुल व मनपाने प्रभागनिहाय चार पथके नियुक्त केले असून एका पथकात सहा जणांचा समावेश