कोरोनामुक्तीसाठी २३ हजार विद्यार्थ्यांची घरातून प्रार्थना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 03:02 PM2020-04-27T15:02:46+5:302020-04-27T15:03:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : कोविड-१९ तथा नोवेल कोरोना व्हायरसच्या संकटापासून देशवासीयांची मुक्तता व्हावी, तसेच कोरोनामुक्तीसाठी लढा देणारे डॉक्टर, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कोविड-१९ तथा नोवेल कोरोना व्हायरसच्या संकटापासून देशवासीयांची मुक्तता व्हावी, तसेच कोरोनामुक्तीसाठी लढा देणारे डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, पोलीस यांच्यासह विविध क्षेत्रांतील सेवाव्रती यांच्याप्रती आदर व्यक्त करून त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शहर व जिल्ह्यातील शाळांच्या सुमारे २३ हजार विद्यार्थी व शिक्षकांनी आपापल्या घरात सायंकाळी प्रार्थना केली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी सर्वांनी घरातच थांबले पाहिजे, तसेच कोरोनापासून लवकर मुक्ती व्हावी यासाठी डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, पोलीस यांच्यासह विविध क्षेत्रांतील संस्थांच्या माध्यमातून कोरोनाविरोधी लढा देणारे सेवाव्रती यांच्याविषयी आदर व्यक्त करून त्यांचे आभार मानण्यासाठी संस्थेकडून शहरासह जिल्ह्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सहभागातून हा अनोखा उपक्रम राबविल्याची महिती संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. राजेंद्र कलाल व सेक्रेटरी अश्विनीकुमार येवला यांनी दिली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. भरत केळकर, उपाध्यक्ष डॉ. सुनील कुटे, संजय लोंढे, उपाध्यक्ष मारुती कुलकर्णी, खजिनदार चार्टड अकाउंटंन्ट अनिल दहिया, सहसचिव मयुर कपाटे, प्रसाद कुलकर्णी यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आॅनलाइन चर्चा झाल्यानंतर शहरी व ग्रामीण भागातील शाळांमधील शाळांचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी यांनी कुटुंबासमवेत शुक्रवारी (दि.२४) सायंप्रार्थना घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शाळेतील वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्हॉट््सग्रुपद्वारे माहिती दिली. त्यानुसार संस्थेच्या नाशिक, नाशिकरोड, सिन्नर, इगतपुरी व नांदगाव तालुक्यातील शाळांचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व संस्थेचे पदाधिकारी यांनी शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता एकाचवेळी आपापल्या कुटुंबासमवेत सायंप्रार्थना करताना ओमकार, गायत्री मंत्र, श्री गणपती स्तोत्र, श्री गणपती अर्थवशीर्ष, श्री मारुती स्तोत्र, श्री रामरक्षा स्तोत्र, पसायदान यापैकी प्रार्थना केली.