लोकमत न्यूज नेटवर्क
देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव वेशीला लागून असलेल्या टाके देवगाव येथे कोरोनाचे चार रु ग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. या चार रु ग्णांच्या संपर्कात आलेल्या अकरा जणांचे अहवाल चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सोमवारी संध्याकाळपर्यंत अहवाल प्राप्त होतील, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योगेश मोरे यांनी दिली.टाके देवगाव येथील मूळ रहिवासी असलेले व वाशिंद (ता. शहापूर) येथे स्थायिक झालेल्या कुटुंबातील एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला असून, त्याच कुटुंबातील चार जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांना त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ कोविड सेंटर रु ग्णालयात दाखल केले आहे. त्यांचा संपर्कात आलेल्या अकरा जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.मागील आठवड्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यात कोरोनाची रु ग्णसंख्या वीस होती. त्यामध्ये आता चार रु ग्णांची भर पडल्याने संख्या चोवीस झाली आहे. आढळलेल्या रु ग्णांपैकी दोन पुरु ष आणि दोन महिला आहेत. या पार्श्वभूमीवर ग्राम प्रशासनाने बाधित मिळून आलेल्या ठिकाणापासून शंभर मीटरचा भाग प्रतिबंधित केला असून, जंतुनाशक फवारणी केली आहे. गणेशोत्सवाच्या प्रारंभीच गावात रु ग्ण आढळून आल्याने मंडळांनी यावर्षी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला.अंगणवाडी सेविका व आशा सेविकांच्या मदतीतून तपासणी करण्यात येत आहे. ग्रामस्थांनी काळजी घेण्याचे आवाहन डॉ. निकिता चित्ते, प्रमोद मराठे, व्ही.एल.सांगळे, पार्वती झोले, बी. ए. मांगटे, अविनाश झोले यांनी केले आहे.नांदगाव शहरात २४ नवे रु ग्णनांदगाव शहरातील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये एकाच दिवसात २४ नवीन रु ग्णांची भर पडली असून, ग्रामीण भागात १२ नवीन रु ग्ण आढळून आले आहेत. बोराळे ४, परधाडी ४, साकोरे ३, वडाळी १ अशी रु ग्ण संख्या आहे. आतापर्यंत तालुक्याची रुग्णसंख्या ६१२ झाली आहे. १५९ रु ग्ण उपचार घेत असून, २१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४३२ जण बरे होऊन घरी परतले आहे. नांदगाव येथे ५२, मनमाड ५० व ग्रामीण भागातील केंद्रांत ५७ रु ग्ण उपचार घेत आहेत.चांदवडला तीन बाधितचांदवड तालुक्यातील खडकओझर येथील तीन संशयित रुग्णांचे कोरोना अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी पंकज ठाकरे यांनी दिली. यात ३५ वर्षीय महिला, १८ वर्षीय मुलगी, ३० वर्षीय महिला यांचा समावेश आहे. नांदगाव नगर परिषद हद्दीत कंटेन्मेट झोनचे अजिबात पालन होत नाही. सामाजिक अंतर व मास्क लावणे यावर नियंत्रण नाही. व्यापारीवर्ग शिस्त पाळत नाही. या सर्वांना कोणाचाच धाक नसल्याने शहरात रु ग्णसंख्या वाढत आहे.- डॉ. अशोक ससाणे,तालुका आरोग्य अधिकारी