इगतपुरीत रु ग्णांची संख्या वाढली; शेणीत, भरवीरमध्ये आढळले रुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 10:44 PM2020-06-12T22:44:18+5:302020-06-13T00:08:07+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण आढळून येण्याचा प्रभाव वाढतच चालला असून, शुक्र वारी तालुक्यातील शेणीत व भरवीर खुर्द या दोन गावांमध्ये प्रत्येकी एक एक ५३ वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. दोन्ही गावांतील नागरिक भयभीत झाले असून, आरोग्य विभागाचा ताण वाढल्यामुळे येथील नागरिकांना प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

संपूर्ण देशासह राज्याला कोरोना प्रादुर्भावामुळे ग्रासले आहे. दिवसेंदिवस या आजाराने रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. ग्रामीण भागातही आपले बस्तान मांडण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत इगतपुरी तालुका या आजाराला अपवाद ठरला होता.
परंतु पंधरा दिवसांपूर्वी तालुक्यातील घोटी येथे, रायांबे, बेलगाव, इगतपुरी शहर आणि आता शेणीत व भरवीर खुर्द या गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. शेणित गावचा रुग्ण हा व्यवसायाने टेम्पो चालक असल्याने तो दररोज भाजीपाला विक्र ीसाठी मुंबई, नाशिक अशा विविध ठिकाणी जात असे, तर दुसरा रुग्ण अंध असून तो जळगाव येथून भावाच्या घरी भरवीर खुर्द येथे दोन दिवसांपूर्वी आला
होता.
-------------------------
नागरिकांनी काळजी घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन
आता तालुक्यातील रु ग्णांची संख्या १४ झाली असून, प्रशासनाने या गावातील सर्व रस्ते बंद केले आहेत. तसेच येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोविड-१९च्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या असून, काळजी घेण्याचे आवाहन धाबे दणाणल्या प्रशानाकडून करण्यात आले आहे.