जिल्ह्यात बाधितांचा आकडा पुन्हा साडेतीन हजारावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 01:45 AM2021-03-31T01:45:39+5:302021-03-31T01:46:27+5:30
जिल्ह्यात गेल्या देान दिवसांपासून दोन हजाराच्या आत आलेला कोरोना बाधितांचा आकडा मंगळवारी (दि.३०) पुन्हा वाढला असून एकाच दिवसात ३ हजार ५३२ रूग्ण आढळले आहेत. तर २३ जणांचा मृत्यू झाला असून त्यात नाशिक शहरातील दहा रूग्णांचा समावेश आहे.
नाशिक : जिल्ह्यात गेल्या देान दिवसांपासून दोन हजाराच्या आत आलेला कोरोना बाधितांचा आकडा मंगळवारी (दि.३०) पुन्हा वाढला असून एकाच दिवसात ३ हजार ५३२ रूग्ण आढळले आहेत. तर २३ जणांचा मृत्यू झाला असून त्यात नाशिक शहरातील दहा रूग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधितांचा संसर्ग वाढतच असून यंदा गतवर्षी पेक्षा अधिक रूग्ण आढळत आहेत. २७ मार्च रोजी जिल्ह्यात आजवरची सर्वात उच्चांकी म्हणजेच ४ हजार ९१८ बाधितांची संख्या आढळली होती. त्यामुळे खळबळ उडाली होती. याच दिवशी तब्बल २५ रूग्णांचा मृत्यू देखील झाला होता.
२३ जणांचा मृत्यू
n मंगळवारी ३ हजार ५३२ रूग्ण आढळले आहेत. यात नाशिक शहरात २ हजार ९६, ग्रामीण भागात १२६९, मालेगाव क्षेत्रात १२१ तर जिल्हा बाह्य ४६ रूग्णांचा समावेश आहे. तर दिवसभरात २३ जणांचा मृत्यू झाला. असून यात नाशिक दहा, मालेगाव दहा, ग्रामीण भागातील नऊ रूग्णांचा समावेश आहे.
n २८ मार्च पासून बाधितांची संख्या कमी हेात गेल्याने
काहीसा दिलासा मिळाला हेाता. या दिवशी २ हजार ९२५ बाधीत आढळले होते.