ओबीसींचे राजकीय आरक्षणासाठी एकत्रित लढा उभारावा : कर्डक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:06 AM2021-08-02T04:06:36+5:302021-08-02T04:06:36+5:30
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सर्व ओबीसी संघटना मालेगाव शहर व तालुका तर्फे येथील ...
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सर्व ओबीसी संघटना मालेगाव शहर व तालुका तर्फे येथील हॉटेल राधिकाच्या सभागृहात आयोजित ‘ओबीसी आरक्षण पे चर्चा’ या कार्यक्रमात कर्डक बोलत होते. यावेळी ॲड. प्रतीक कर्डक, नितीन शेलार, अनिल नळे, संतोष पुंड, नरेंद्र सोनवणे, रमेश उचित, चंद्रकांत गवळी, धर्मा भामरे, रामदास बोरसे, प्रकाश वाघ, आदी उपस्थित होते.
केंद्र शासनाने संकलित केलेली माहिती न्यायालयासमोर सादर करावी किंवा राज्य शासनाने ओबीसी आरक्षण संदर्भातील माहिती संकलित करावी असे मत मांडतांना कर्डक म्हणाले, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने राज्य शासनाने नियुक्त केलेल्या निरगुडे आयोगाची नाशिक येथे समता परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह भेट घेऊन ओबीसी आरक्षणासंदर्भातील डाटा संकलित करून राजकीय आरक्षण पुनर्स्थापित करण्याची विनंती आयोगाला करण्यात आली आहे. शासनाने नियुक्त केलेल्या निरगुडे आयोगामार्फत चांगले कामकाज सुरू असून, त्यांच्या माध्यमातून ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण लवकरच पुनर्स्थापित होईल असा विश्वासही कर्डक यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी विनोद शेलार, कैलास तिसगे, भिका कोतकर, प्रभाकर जाधव, संतोष पोफळे, रवींद्र गुरव, सुनील सोनवणे, रमेश जगताप, युवराज गिते, विशाल भावसार, चंद्रशेखर बेंडाळे, शरद दुसाणे, प्रकाश सावकार, बालेभाई मन्सुरी, शाबान तांबोळी, विलास लोणारी, शत्रुघ्न चंदन, सतीश क्षत्रिय यांच्यासह ओबीसी समाजाच्या सर्व घटकातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.