मालेगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील प्रशासकीय यंत्रणेने शनिवारी मिरवणूक मार्गांची पाहणी केली.येत्या १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी केली जाणार आहे. शिवप्रेमींकडून मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे. मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीची मोठी मिरवणूक निघत असते. मिरवणूक मार्गात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी व त्यावरील उपाययोजनेसाठी अधिकाऱ्यांनी किदवाईरोड, पेरी चौक, मुल्लाबाडा, तांबा काटा, पोफळे राममंदिर, छत्रपती शिवाजी महाराज टाऊन हॉल, शनि मंदिर, उर्दू लायब्ररी, रामसेतू पुल या मिरवणूक मार्गांची पाहणी केली.यावेळी पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, मंगेश चव्हाण, मनपा उपायुक्त नितीन कापडणीस, वीज वितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता शैलेश महाजन, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, भाऊसाहेब पटारे, प्रवीण वाडीले, आव्हाड, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक पाटील, सदस्य केवळ हिरे, हरिप्रसाद गुप्ता, रामदास बोरसे, सुनील चांगरे आदी उपस्थित होते.
मालेगावी मिरवणूक मार्गाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 1:15 AM
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील प्रशासकीय यंत्रणेने शनिवारी मिरवणूक मार्गांची पाहणी केली.
ठळक मुद्देशिवजयंती : मध्यवर्ती समितीची तयारी सुरू