राम मंदिर उभारणी निमित्ताने घोटीत पणत्या,मिठाई वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 04:46 PM2020-08-05T16:46:24+5:302020-08-05T16:47:02+5:30
वाडीवºहे : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्या येथील राम मंदिर पायाभरणी कार्यक्र म बुधवारी (दि.५) झाल्याच्या निमित्ताने भाजप युवा मोर्चाच्या वतीने घोटी शहरात २१०० पणत्या व मिठाईचे वाटप केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडीवºहे : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्या येथील राम मंदिर पायाभरणी कार्यक्र म बुधवारी (दि.५) झाल्याच्या निमित्ताने कार्यक्र मानिमित भाजप युवा मोर्चाच्या वतीने घोटी शहरात भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश परदेशी व बाळासाहेब सुराणा यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चाचे सरचिटणीस मयूर परदेशी यांच्यासह गणेश शिंदे, निखिल हंडोरे, मयूर कडवे, मनीष मुनोत, विक्र म मुनोत, योगेश कडवे, ज्ञानेश्वर भोर, दीपक भोर, निलेश जोशी यांनी २१०० पणत्या व मिठाईचे वाटप केले.
दरम्यान तालुक्यात हिंदू बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या कार्यक्र माच्या पार्श्वभूमीवर घोटी शहरात पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.