मनपाच्या ‘त्या’ चार नगरसेवकांना ‘शुभेच्छा’ देणे भोवले; मनपाच्या नियमांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 02:30 PM2019-06-08T14:30:53+5:302019-06-08T14:31:25+5:30

कायदा सर्वांना समान असून कायद्याचे उल्लंघन करत अनधिकृतरित्या शुभेच्छा फलक झळकाविणे चार नगरसेवकांना चांगलेच भोवले आहे.

offence the 'those' of the corporators 'Greetings'; Violation of NMC's rules | मनपाच्या ‘त्या’ चार नगरसेवकांना ‘शुभेच्छा’ देणे भोवले; मनपाच्या नियमांचे उल्लंघन

मनपाच्या ‘त्या’ चार नगरसेवकांना ‘शुभेच्छा’ देणे भोवले; मनपाच्या नियमांचे उल्लंघन

Next
ठळक मुद्देनगरसेवकांना बेकायदेशीरपणे शुभेच्छा फलक उभारण्याच्या नियम व कायद्याचा विसर पडला

नाशिक : मनपा प्रशासनाची कुठलीही पुर्व परवानगी न घेता शहरात रमजान ईदनिमित्त शुभेच्छा फलक अनधिकृतपणे उभारून विद्रूपीकरण केले तसेच कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनपाच्या चार नगरसेवकांविरूध्द भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरात कुठलेही फलक उभारण्यापुर्वी महापालिका विभागीय अधिकाऱ्यांची पुर्व परवानगी मिळविणे आवश्यक असून निश्चित करून दिलेल्या जागेवर फलक उभारण्यास मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून परवानगी दिली जाते. विना परवानगी अनधिकृतरित्या फलक उभारणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे. कायदा सर्वांना समान असून कायद्याचे उल्लंघन करत अनधिकृतरित्या शुभेच्छा फलक झळकाविणे चार नगरसेवकांना चांगलेच भोवले आहे. पुर्व विभागातील वडाळारोडवरील महापालिके च्या भुखंडाची संरक्षक भिंत असो, तसेच सारडा सर्कल भागातील दुभाजकाचा आधार घेत व वाहतूक बेटावर संबंधितांच्या कार्यकर्त्यांनी फलक उभारले. याप्रकरणी महापालिकेच्या पुर्व विभागातील कर्मचा-याकडून संबंधितांविरूध्द लेखी फिर्याद भद्रकाली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी नगरसेवक तथा आरोग्य सभापती सतीश कुलकर्णी, चंद्रकांत खोडे, रूपाली निकुळे, शाहीन मिर्झा या चौघा संशयितांविरूध्द पोलिसांनी महाराष्ट प्रिव्हेशन आॅफ डिफेन्समेंट आॅफ प्रॉपर्टी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आला.
महापालिकेच्या नियमांचे पालन करून त्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करण्याची जबाबदारी नगरसेवकांची असताना स्वत: नगरसेवकांकडून जेव्हा नियम, कायदे धाब्यावर बसविले जातात तेव्हा मात्र आश्चर्य व्यक्त केले जाते. एक दोन नव्हे तर चारही नगरसेवकांना बेकायदेशीरपणे शुभेच्छा फलक उभारण्याच्या नियम व कायद्याचा विसर पडला हे विशेष! सर्रासपणे त्यांच्या आदेशावरून कार्यकर्त्यांनी शहरातील रस्त्यांचे दुभाजक, वाहतूक बेट, मनपाच्या मोकळ्या भुखंडांच्या संरक्षक भींतींवर नगरसेवकांना ‘झळकविले’ मात्र महापालिकेच्या पुर्व विभागाकडून संबंधित लोकप्रतिनिधींविरूध्द विनापरवानगी फलक उभारून शहर विद्रुपीकरण केल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस उपनिरिक्षक एन.एफ.जाधव करीत आहेत.

Web Title: offence the 'those' of the corporators 'Greetings'; Violation of NMC's rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.