आॅफिसबॉय, ड्रायव्हरचे काम करून मालकांना लाखोंचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 11:30 PM2018-08-31T23:30:17+5:302018-09-01T00:16:41+5:30

कधी आॅफिसबॉय तर कधी वाहनचालकाचे काम करून तसेच वेगवेगळे नाव वापरून ज्याठिकाणी काम करायचा तेथील मालकाचे सही असलेले तसेच कोरे धनादेश चोरी तर कधी वाहनचोरी व घरफोडी करून धनादेशाद्वारे बॅँकेतून रक्कम हडपणाऱ्या सिन्नर तालुक्यातील रतेश ऊर्फ रितेश विश्राम कर्डक (२१) याला पंचवटी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Officeboy, the owner of the driver by working as a driver, earn millions | आॅफिसबॉय, ड्रायव्हरचे काम करून मालकांना लाखोंचा गंडा

आॅफिसबॉय, ड्रायव्हरचे काम करून मालकांना लाखोंचा गंडा

Next

पंचवटी : कधी आॅफिसबॉय तर कधी वाहनचालकाचे काम करून तसेच वेगवेगळे नाव वापरून ज्याठिकाणी काम करायचा तेथील मालकाचे सही असलेले तसेच कोरे धनादेश चोरी तर कधी वाहनचोरी व घरफोडी करून धनादेशाद्वारे बॅँकेतून रक्कम हडपणाऱ्या सिन्नर तालुक्यातील रतेश ऊर्फ रितेश विश्राम कर्डक (२१) याला पंचवटी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे या कर्डकवर पंचवटी, आडगाव, गंगापूर, अंबड व म्हसरूळ अशा पाच पोलीस ठाण्यात फसवणूक, घरफोडी तसेच वाहनचोरी असे तब्बल ११ गुन्हे दाखल आहेत.  पंचवटी परिसरात सध्या वास्तव्यास असलेल्या कर्डक याने २०१३ ते २०१८ या कालावधीत नाशिक शहरातील विविध ठिकाणी कधी आॅफिसबॉय तर कधी वाहनचालकाचे काम करायचा तेथे मालकाचा विश्वास संपादन केल्यानंतर मालकाने ठेवलेले कोरे किंवा स्वाक्षरी असलेले धनादेश चोरायचे त्यानंतर पंधरवड्यानंतर काम सोडून द्यायचे व चोरी केलेले धनादेशावर बनावट स्वाक्षरी करून वेगवेगळया बॅँकेत खाते असलेल्या ठिकाणी जमा करून त्यातील रक्कम काढून घ्यायची असे प्रकार करीत असे. दरम्यान, २०१० मध्ये स्वत:च्या घरात राहत असताना २५ लाख रुपये चोरी केले होते म्हणून वडिलांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाल्याने अटक केली होती.
आरोपीची चोरीची अशी होती पद्धत
२०१३ गंगापूररोड येथे रितेश कर्डक हे खरे नाव वापरून अनिल पाठक यांच्याकडे वाहनचालक म्हणून कामाला लागला. त्यानंतर आठवडाभरातच त्यांची सॅन्ट्रोकार १ लाख ५ हजार रुपयांना विक्री करून राजस्थान भवानीपुरा येथे रामजशजी मीना यांची गहाण जमीन घेतली नंतर सदर जागामालकाकडून ११ एकर शेती २७ लाख रुपयांना नावावर करून घेतली होती.
२०१४ दिलीप वाघ (बुधे हलवाई) यांच्याकडे हरिष पुजारी नावाने वाहनचालक म्हणून १५ दिवस काम केल्यानंतर त्यांची तवेरा गाडी पाथर्डीफाटा येथे बेवारस सोडून दिली होती. त्याचवर्षी गंगापूररोडला विक्रम कपाडिया यांच्याकडे दिगंबर पुजारी नाव वापरून वाहनचालक काम करताना त्यांची होंडा सिटी कार अहमदनगर येथे एका इसमाला अडीच लाख रुपयांना विक्री केली त्यातील १ लाख ३५ हजार राजस्थान येथे जमीनमालकाला दिले.
२०१७ अंबड येथे हेडा नामक व्यक्तीच्या श्रीराम मार्केटिंग कंपनीत रवींद्र नावाने आॅफिसबॉय म्हणून काम करून आठवडाभर काम केल्यानंतर पाच धनादेश चोरी केले. त्यानंतर ४० हजारांच्या कोºया धनादेशावर मालकाच्या नावाच्या खोट्या स्वाक्षºया करून कॉसमॉस व कॅनरा बॅँकेत चेक वटविले.
२०१८ रोजी सावरकरनगर येथे ठाकूर यांच्या सोम कन्स्ट्रक्शन कंपनीत धीरज मतसागर नावाने आॅफिसबॉय म्हणून तीन दिवस काम केले त्यावेळी तीन धनादेश चोरून धनादेशावर खोटी स्वाक्षरी करून धनादेश कॉसमॉस बॅँकेत टाकून वटविण्याचा प्रयत्न केला. त्याचवर्षी सातपूर एमआयडीसी येथे पुष्कराज ट्रेडर्स येथे मतसागर नावाने आॅफिसबॉय म्हणून चार दिवस काम केले व मालकाची स्वाक्षरी असलेला कोरा धनादेश चोरून ४० हजारांची रोकड बॅँकेतून काढली. नंतर भद्रकाली येथील एजी ग्रुप यांच्याकडे मतसागर नावाने आठवडाभर आॅफिसबॉय म्हणून काम करताना चार धनादेश चोरून ४५ हजार रुपये काढले.
मे २०१८ मेघदूत शॉपिंग सेंटरला बन्सीलाल डेरे यांच्याकडे आॅफिसबॉय म्हणून पाच दिवस काम केल्यावर तीन धनादेश चोरी करून एक लाख रुपये काढले. आॅगस्ट २०१८ मध्ये संजय नवल यांच्या सीबीएस येथील व्यंकटेश डेव्हलपर्स मतसागर नावाने आॅफिसबॉय म्हणून दोन दिवस काम करून सहा धनादेश चोरी करून तब्बल ६० हजारांची रोकड काढून गुजरातला मौजमजा केली.
आॅगस्ट महिन्यात सीतागुंफा स्नेहसदन येथे होस्टेलमध्ये राहत असताना शेजारी राहणाºया किरण सावळा यांचा लॅपटॉप वापरण्यासाठी घेतला त्यानंतर तो राजीव गांधी भवनसमोर असलेल्या दुकानात सात हजाराला विकला तर मित्र चंद्रकांत कापडणीस व चैतन्य जोशी अशांनी मिळून पंचवटी कारंजा येथून दोन लॅपटॉप घेऊन मुंबईला ६ हजार रुपयांना विक्री केले.

Web Title: Officeboy, the owner of the driver by working as a driver, earn millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.