अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

By admin | Published: January 17, 2017 01:27 AM2017-01-17T01:27:22+5:302017-01-17T01:27:40+5:30

अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

Officers' Appointments | अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

Next

नाशिक : २१ फेबु्रवारी रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रत्येक तीन प्रभागांसाठी एक निवडणूक अधिकारी असणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध अधिकाऱ्यांनुसार सध्या आठ निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  नियुक्त अधिकाऱ्यांमध्ये अहमदनगर महापालिकेतील उपआयुक्त अजय चारठाणकर व सहायक निवडणूक अधिकारी जळगावचे तहसीलदार बी. ए. कापसे (प्रभाग १ ते ३ - पंचवटी विभागीय कार्यालय), शिरपूर, जि. धुळे येथील उपविभागीय अधिकारी नितीन गावंडे व सहायक निवडणूक अधिकारी तहसीलदार श्रीमती उषाराणी देवगुणे (प्रभाग ४ ते ६-पंचवटी विभागीय कार्यालय), मालेगाव महापालिकेतील उपआयुक्त प्रदीप पठारे व सहायक निवडणूक अधिकारी नगरमधील तहसीलदार आर. बी. थोटे (प्रभाग ७, १२, २४- पश्चिम विभागीय कार्यालय), अहमदनगर येथील जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रीमती ज्योती कावरे व सहायक निवडणूक अधिकारी जळगावचे जिल्हा करमणूक कर अधिकारी महेश चौधरी (प्रभाग १३,१४ व १५- पूर्व विभागीय कार्यालय), नंदुरबार येथील पुरवठा अधिकारी विजय भांगरे व सहायक निवडणूक अधिकारी पिंपळनेर येथील अपर तहसीलदार वाय. सी. सूर्यवंशी (प्रभाग १६,२३ व ३०- पूर्व विभागीय कार्यालय), नाशिकच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती पल्लवी निर्मळ व सहायक निवडणूक अधिकारी जळगावचे तहसीलदार पी. पी. लोखंडे (प्रभाग २०, २१ व २२ - नाशिकरोड विभागीय कार्यालय), धुळे महापालिकेतील उपआयुक्त रवींद्र जाधव व सहायक निवडणूक अधिकारी सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव (प्रभाग २५,२६ व २८- सिडको विभागीय कार्यालय), अहमदनगर महापालिकेतील उपआयुक्त भालचंद्र बेहरे व सहायक निवडणूक अधिकारी तहसीलदार बबन काकडे (प्रभाग ८,९,१० व ११- सातपूर विभागीय कार्यालय) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आणखी दोन निवडणूक अधिकाऱ्यांच्या लवकरच नियुक्त्या होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Officers' Appointments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.