अधिकाऱ्यांच्या टोलवाटोलवीत रस्ता ' खड्यात'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 10:31 PM2020-10-14T22:31:40+5:302020-10-15T01:38:25+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर व संगमनेर या दोन तालुक्यांना जोडणाºया नांदूरशिंगोटे गावातील साडेतीन किलोमीटर रस्ता कोणत्या विभागाकडे आहेत याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या तीन ते चार वर्षापासून रस्त्याची देखभाल दुरुस्ती कोणत्याच विभागाकडून होत नसल्याने दुरावस्था झाली आहे. मात्र आधिकाऱ्यांच्या टोलवाटोलवीत रस्ता खड्यात गेला आहे.

नाशिक - पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -५० हा पुर्वी सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावातून जात होता. सदरचा रस्ता चौपदरीकरण होण्याअगोदर राष्ट्रीय महामार्गाकडे होता. त्यामुळे दरवर्षी रस्त्याची देखभाल दुरुस्ती होत होती. चार वर्षीपुर्वी नाशिक - पुणे महामार्गाचे सिन्नर ते खेड पर्यंत चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर गावातील रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे.
गावातून जाणाºया साडेतीन किलोमीटर रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी कोणत्या विभागाकडे मागणी करायची असा प्रश्न ग्रामपंचायत प्रशासनाला पडला आहे. हाँटेल संदीप ते यशराज पेट्रोलपंपापर्यंत बाह्यवळण रस्ता गेला असल्याने सदरचा रस्ता आपोआपच राज्य महामार्गाकडे जात असल्याचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिका?्यांचे म्हणणे आहे. तर रस्ता चौपदरीकरण करण्यासाठी सन २०१५ -१६ मध्येच संबंधित विभागाकडे गेला असल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागाचा संबंध येत नसल्याचे त्या विभागाच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे.
दोन दिवसांपूर्वीच संबंधित रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार झाला असून याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे बांधकाम विभागाने सांगितले. नांदूरशिंगोटे गाव मध्यवर्ती ठिकाणी असल्याने तसेच परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने येथे नेहमीच वाहनांची वर्दळ असते. सिन्नर, संगमनेर, अकोला, लोणी, कोपरगाव, श्रीरामपूर आदी भागात जाण्यासाठी नांदूरशिंगोटे येथून सोयीचे असल्याने अवजड वाहनेही गावातील रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे रस्त्याची दुरावस्था होत असल्याने त्याची नियमित डागडुजी होणे गरजेचे आहे.