जुन्या नोटा जमा करून लोक दमले
By admin | Published: December 31, 2016 01:02 AM2016-12-31T01:02:15+5:302016-12-31T01:02:15+5:30
अखेरच्या दिवशी जेमतेम गर्दी : आता ८० टक्के पैसे एटीएमद्वारे मिळणार; बहुतांशी सुरू
भगूर : भगूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष म्हणून शिवसेनेच्या मनीषा कस्तुरे व स्वीकृत सदस्यपदी पंकज कलंत्री व फरीद शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. भगूर नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या नवनियुक्त नगरसेवकांची बैठक शुक्रवारी सकाळी ११ वाजता नगरपालिकेच्या सभागृहात नगराध्यक्षा अनिता करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी उपनगराध्यक्ष निवडीचा विषय सभेत मांडला. उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या मनीषा कस्तुरे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले. तसेच स्वीकृत सदस्यपदी पंकज कलंत्री व फरीद शेख यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आल्याचे नगराध्यक्ष अनिता करंजकर यांनी घोषित केले. यावेळी बैठकीला नगरसेवक विजय करंजकर, दीपक बलकवडे, उत्तम आहेर, रघुनाथ साळवे, सुरेश वालझाडे, भाऊसाहेब गायकवाड, मोहन करंजकर, स्वाती झुटे, अश्विनी साळवे, जयश्री देशमुख, शकुंतला कुंडारिया, संगीता पिंपळे, कविता यादव, प्रतिभा घुमरे, अनिता ढगे आदि उपस्थित होते. उपनगराध्यक्षपदी मनीषा कस्तुरे व स्वीकृत सदस्यपदी पंकज कलंत्री, फरीद शेख यांची निवड होताच शिवसैनिकांनी गुलाल उधळून फटाके फोडून घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी माजी नगराध्यक्ष रोहिणी गायकवाड, संजय बलकवडे, उत्तम पाटील, कैलास यादव, आदि मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)