जिल्ह्यात दीडशे कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:15 AM2021-02-12T04:15:23+5:302021-02-12T04:15:23+5:30
नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (दि. ११) एकूण १५० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, २०५ रुग्ण नव्याने बाधित झाले ...
नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (दि. ११) एकूण १५० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, २०५ रुग्ण नव्याने बाधित झाले आहेत. दरम्यान, नाशिक ग्रामीणला एक मृत्यू झाल्याने, आतापर्यंतच्या बळींची संख्या २,०६६ वर पोहोचली आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १७ हजार ५४७ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख १४ हजार ३२० रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर १,१६१ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९७.२५ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९७.९७, नाशिक ग्रामीण ९६.३६, मालेगाव शहरात ९२.८५, तर जिल्हाबाह्य ९४.३१ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या ५ लाख १४ हजार ०१८ असून, त्यातील ३ लाख ९५ हजार २५३ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख १७ हजार ५४७ रुग्ण बाधित आढळून आले असून, १२१८ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.