भालेराव कुटुंबीयांना सव्वा लाखाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:16 AM2021-07-07T04:16:47+5:302021-07-07T04:16:47+5:30
दोडी येथील पंडित भालेराव यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक स्थिती जेमतेम आहे. ही बाब लक्षात घेऊन बालमित्रांनी ...
दोडी येथील पंडित भालेराव यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक स्थिती जेमतेम आहे. ही बाब लक्षात घेऊन बालमित्रांनी एकत्र येत पंडित यांच्या कुटुंबाला मदतीचा हात दिला. दहावीतील २००० सालच्या बॅचच्या या वर्गमित्रांनी आपापला वाटा उचलून ही रक्कम जमा केली.
पंडित यांच्या मुलीच्या नावे एक लाख रुपये ठेव पावती आणि ३२ हजार ६१२ रुपये छाया भालेराव यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले. या व्यवहाराच्या पावत्या भालेराव कुटुंबीयांना सुपुर्द करण्यात आल्या. वर्गमित्रांच्या आर्थिक मदतीने भालेराव कुटुंबीयही भारावले. या वेळी पांडुरंग आव्हाड, सचिन केदार, संतोष सांगळे, संजय सांगळे, भाऊराव आव्हाड, नीलेश केदार, पंकज बिरारी, शंकर आव्हाड, रोहित आव्हाड, भरत केदार आदींसह वर्गमित्र उपस्थित होते.
इन्फो...
गरीब परंतु हसरा, गमतीजमती करणाऱ्या प्रेमळ स्वभावाच्या आमच्या मित्राचे, पंडितचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्याच्या कुटुंबाची स्थिती बेताची आहे. आबाळ सहन करणाऱ्या या मित्राच्या मैत्रीखातर वर्गमित्रांनी एकत्र येऊन हा खारीचा वाटा उचलला असल्याची माहिती बालपणीच्या मित्रांनी दिली.
फोटो - ०५ सिन्नर भालेराव
सिन्नर तालुक्यातील भालेराव कुटुंबीयांना आर्थिक मदत देताना वर्गमित्र नीलेश केदार, पांडुरंग आव्हाड, सचिन केदार, संतोष सांगळे, संजय सांगळे आदी.
050721\05nsk_12_05072021_13.jpg
सिन्नर तालुक्यातील भालेराव कुटुंबियांना आर्थिक मदत देताना वर्गमित्र नीलेश केदार, पांडुरंग आव्हाड, सचिन केदार, संतोष सांगळे, संजय सांगळे आदी.