नाशिक विभागात शंभर टक्के पुस्तक पुरवठा; समग्र शिक्षांतर्गत ८६ लाख ८७ हजार ९५७ प्रतींचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 04:03 PM2020-06-18T16:03:28+5:302020-06-18T16:08:39+5:30
बालभारतीच्या नाशिक विभागीय भांडारातून नाशिकसह धुळे, नंदुरबार व जळगाव या चारही जिल्ह्यांध्ये तालुकास्तरापर्यंत पाठ्यपुस्तकांचे शंभर टक्के वितरण करण्यात आले आहे. एकात्मिक अंतर्गत दोन प्रकारची पुस्तके विभागीय कार्यालयास प्राप्त झाली आहे.
नशिक : समग्र शिक्षा अभियानांतर्गत बालभारतीच्या नाशिक विभागीय भांडारातून नाशिकसह धुळे, नंदुरबार व जळगाव या चारही जिल्ह्यांध्ये तालुकास्तरापर्यंत पाठ्यपुस्तकांचे शंभर टक्के वितरण करण्यात आले आहे. एकात्मिक अंतर्गत दोन प्रकारची पुस्तवितरण पुस्तके विभागीय कार्यालयास प्राप्त झाली असून तर येत्या आठवडाभरात एकात्मिक पाठ्य पुस्तकांचाही पुरवठा करण्याता येणार आहे.
नाशिक विभागातील चारही जिल्ह्यात बालभारतीच्या विभागीय भांडारामार्फत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. यात एकात्मिक पाठ्यपुस्तक उफक्रमातील पुस्तकांचा समावेश नसला तरी समग्र शिक्षा अंतर्गत नियमित वितरीत करण्यात येणाºया शंभरटक्के पुस्तकांचे वितरण पूर्ण झाल्याची माहीती विभागीय भांडार व्यावस्थापक पी. एम. बागूल यांनी दिली आहे. त्यानुसार विभागात समग्र शिक्षांतर्गत ८६ लाख ८७ हजार ९५७ प्रतींचे वितरण आले असून नाशिक जिल्हा परिषदसाठी २६ लाख२३ हजार ३४, नाशिक महापालिके ला ५ लाख ३० हजार ९१४, धुळे जिल्हा परिषद -१८लाख २३ हजार ३९९, धुळे महापालिका-१ लाख ९३ हजार ७४६, जळगाव जिल्हा परिषद -२४लाख १८ हजार ४१७, जळगाव महापालिका १ लाख ७१ हजार ८९, नंदुरबारसाठी ११ लाख ११ हजार ४५८ पुस्तकांचा पुरवठ करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे एकात्मिकची काही पुस्तके प्राप्त झाली असून येत्या आठवडाभरातच या पुस्तकांचेही विभागातील सर्व पथदशी प्रकल्पातील तालुक्यांना वितरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे एकात्मिक पाठ्यपुस्तकच्या पथदर्शी प्रकल्पातील तालुक्यांमध्ये विद्यार्थ्यांना अजूनही काळ पुस्तकांची प्रतिक्षा करावी लागणार आहे.