शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
3
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
5
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
7
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
8
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
10
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
12
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
13
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
14
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
15
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
16
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
17
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
19
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
20
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

कार-दुचाकी अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 11:22 PM

इगतपुरी : मुंबईहून इगतपुरी शहरात जोरात येणाऱ्या सुझुकी कंपनीच्या झेन एस्टीलो कारने मोटारसायकलला समोर धडक दिल्याने मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी (दि. १४) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारात इगतपुरी न्यायालयाच्या समोर घडली.

ठळक मुद्देइगतपुरी : जुना मुंबई-आग्रा महामार्गावरील घटना

इगतपुरी : मुंबईहून इगतपुरी शहरात जोरात येणाऱ्या सुझुकी कंपनीच्या झेन एस्टीलो कारने मोटारसायकलला समोर धडक दिल्याने मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी (दि. १४) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारात इगतपुरी न्यायालयाच्या समोर घडली.सविस्तर वृत्त असे की, इगतपुरी न्यायालयासमोर मुंबईहून इगतपुरी शहरात भरवेगात येणारी सुझुकी कंपनीची झेन एस्टीलोकार (एम. एच. १५ बी. एक्स ५५३७) ही समोरून येत असताना मोटारसायकल होंडा शाईन (एम. एच. १५ ई. सी. ९५६६) ला ठोस मारल्याने मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला.या घटनेत कारचालक वयोवृद्ध असून, शेखर वेणुगोपाल हत्तगंडी (६६, रा. मुंबई) यांनी वाहन वेगात सुरू ठेवल्याने मोटारसायकलस्वार प्रशांत प्रकाश मोरे (३४, रा. शिवनेरी कॉलनी, रेल्वे पॉवर हाऊस) हा गाडीखाली घसरून चिरडला गेला. या घटनेची माहिती स्थानिक युवकांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांच्या मदतीने प्रशांत याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय सूत्रांनी त्याला मृत घोषित केले.या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक शरद सोनवणे व पोलीस कर्मचारी सचिन देसले, गणेश वराडे आदी तपास करीत आहे.दोन दिवसांपासून इगतपुरीत पावसाच्या सरी सुरू असल्याने रस्ते ओले झाले आहेत. त्यात ठिकठिकाणी खड्डे तयार होऊन त्या खड्ड्यात पाणी साचले असून या खड्ड्यांमुळे अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना अलीकडेच घडल्याने तसेच न्यायालय व जोगेश्वरी येथे गतिरोधक बसवावे, अशी मागणी होत आहे.पादचारी व वाहनधारक आपला जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करीत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील जुन्या मुंबई महामार्गाच्या रस्त्याची चाळण झाली असताना नेते मंडळी व लोकप्रतिनिधी डोळेझाक करीत सार्वजनिक बांधकाम विभागाला कोणताही जाब विचारत नसल्याने आणखी किती बळी घेणार, अशी खंत शहरातील नागरिकांनी व्यक्त करीत आहे. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू