नाशिक : शहरात उंटवाडी भागातील मुथूट फायनान्स कार्यालयात अज्ञात दरोडेखोरांनी लूट करण्याच्या उद्देशाने प्रवेश करीत गोळीबार केल्याने संस्थेचा तांत्रिक अभियंता ठार झाला आहे. मृत्यू झालेल्या अभियंत्याने समयसूचकता दाखवित सिक्युरिटी अलार्म वाजवून संस्थेचा मुद्देमाल वाचविला; मात्र या घटनेत त्याचाच दुर्दैवी मृत्यू झाला, तर व्यवस्थापकासह दोन जण जखमी झाले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.नाशिकमध्ये सिडको परिसरात गेल्या दोन दिवसांपूर्वीच चार दुकाने फोडल्याची घटना ताजी असतानाच मुथूट फायनान्सच्या उंटवाडी येथील कार्यालयावर चार दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. संस्थेचे कार्यालय नियमितपणे सुरू झाले असताना सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, चार दरोडेखोरांनी कार्यालयात प्रवेश करीत पिस्तूलचा धाक दाखवून कर्मचारी व ग्राहकांचे सर्व मोबाइल ताब्यात घेतले. बँकेतील कर्मचाऱ्यांनाही एका बाजूला घेत असताना बँकेतील तांत्रिकअभियंता साजू सॅम्युएल या कर्मचाऱ्यांने समयसूचकता दाखवित धोक्याची सूचना देणारा अलार्म वाजविला. (पान ३ वर)त्यामुळे आपला हेतू फसल्याचे लक्षात येताच दरोडेखोरांनी संतापाच्या भरात सॅम्युएल याच्यावर बेच्छुट गोळीबार केला. यात सॅम्युएल यांना छातीत तीन गोळ्या लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. या दरम्यान, संस्थेचे व्यवस्थापक चंद्रशेखर देशपांडे व कर्मचारी कैलास जयन यांनी दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या डोक्यावर पिस्तूलच्या मागची बाजू डोक्यात मारून जखमी करीत घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना संस्थेच्या सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाली असून, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या साह्णाने संशयित आरोपींचे छायाचित्र तयार केली आहे. त्याआधारे पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत असून, शहरात सर्व बाजूने नाकाबंदी करण्यात आली आहे.गोळीबारात मयत झालेले अभियंता साजू सॅम्युएल मूळचे केरळचे असून, ते मुंबई शाखेतून चार दिवसांपूर्वीच नाशकात रुजू झाले होते. त्यांच्या धाडसाने अनर्थ टळला. मात्र या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. सॅम्युएल यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असल्याचे समजते.
मुथूट फायनान्सवरील सशस्त्र दरोड्यात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 2:07 AM
शहरात उंटवाडी भागातील मुथूट फायनान्स कार्यालयात अज्ञात दरोडेखोरांनी लूट करण्याच्या उद्देशाने प्रवेश करीत गोळीबार केल्याने संस्थेचा तांत्रिक अभियंता ठार झाला आहे. मृत्यू झालेल्या अभियंत्याने समयसूचकता दाखवित सिक्युरिटी अलार्म वाजवून संस्थेचा मुद्देमाल वाचविला; मात्र या घटनेत त्याचाच दुर्दैवी मृत्यू झाला, तर व्यवस्थापकासह दोन जण जखमी झाले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
ठळक मुद्देनाशकात भरदिवसा थरार : अभियंत्याच्या धाडसामुळे मुद्देमाल वाचला