अंदरसूल येथे आगीत कांदा चाळ खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 06:09 PM2019-01-08T18:09:03+5:302019-01-08T18:09:18+5:30
अचानक लागलेल्या आगीत कांदा चाळ खाक होऊन दोन शेतकऱ्यांचे एकूण एक लाख वीस हजारांचे नुकसान झाले.
अंदरसूल : येथे अचानक लागलेल्या आगीत कांदा चाळ खाक होऊन दोन शेतकऱ्यांचे एकूण एक लाख वीस हजारांचे नुकसान झाले.
येथील शेतजमीन मालक शिवनाथ पुंजाप्पा गाडे व विश्वनाथ पुंजाप्पा गाडे यांच्या मालकीच्या शेतातील चारा व कांदा रिकामी चाळ, चिंचेचे झाड हे अचानक लागलेल्या आगीत खाक झाले. चिंचेचे झाड व कांद्याची रिकामी चाळ खाक झालेल्या शिवनाथ पुंजाप्पा गाडे यांची ऐंशी हजार व विश्वनाथ पुंजाप्पा गाडे यांची चाळीस हजार रु पयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा केला आहे. एकाच वेळेस लागलेल्या आगीचे कारण समजू शकले नाही. गावातील व परिसरातील नागरिकांनी गावालगत असलेल्या या शेताकडे धाव घेऊन गर्दी केली होती. अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.