कांदा चार हजार रुपये क्विंटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 12:57 AM2019-10-24T00:57:34+5:302019-10-24T00:58:13+5:30
देशांतर्गत मागणी वाढल्याने बुधवारी (दि. २३) कांद्याला ४०१९ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. ५८ वाहंनामधून १५०० क्विंटल कांदा वणीच्या उपबाजारात विक्रीसाठी उत्पादकांनी आणला होता. कमाल ४०१९, किमान ३३००, तर सरासरी ३८०० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी-विक्रीचे व्यवहार पार पडले.
वणी : देशांतर्गत मागणी वाढल्याने बुधवारी (दि. २३) कांद्याला ४०१९ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. ५८ वाहंनामधून १५०० क्विंटल कांदा वणीच्या उपबाजारात विक्रीसाठी उत्पादकांनी आणला होता. कमाल ४०१९, किमान ३३००, तर सरासरी ३८०० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी-विक्रीचे व्यवहार पार पडले.
सध्या देशांतर्गत मोठ्या प्रमाणावर कांद्याला मागणी वाढलेली आहे. त्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने दरवाढ होत आहे. उत्पादकांना दिवाळी सणाच्या तोंडावर काहीअंशी दिलासादायक अशी स्थिती आहे. दरम्यान, दिवाळी सणानिमित्त काही दिवस उपबाजारातील खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद राहणार असल्याने उत्पादकांनी कांदा विक्रीचा वेग वाढविला आहे, तर व्यापारीवर्गही मागणीप्रमाणे कांदा देशांतर्गत विक्री करीत आहे.
लासलगावी पाच दिवस लिलाव बंद
लासलगाव येथील बाजार समितीत बुधवारी कांद्याला ३७६१ रुपये प्रतिक्ंिटल दर मिळाला. आवक २९६९ क्विंटल २९० नग वाहनातुन झाली. प्रतिक्विंटल उन्हाळ कांदा किमान १२०० ते ३७६१ रुपये सर्वात जास्त तर सरासरी ३५०० रुपये दर होते.
दीपावली सणानिमित्त लासलगाव बाजार समिती शुक्र वार, दि. २५ ते मंगळवार, दि. २९ आॅक्टोबरपर्यंत बंद राहतील व बुधवार, दि. ३० आॅक्टोबरपासून लिलाव पूर्ववत सुरू राहणार आहेत.