अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे कांदा होतोय खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:11 AM2021-06-20T04:11:33+5:302021-06-20T04:11:33+5:30

चौकट- नैसर्गिक आपत्ती, परराज्यातील कांदा उत्पादन यानुसार आपल्याकडील कांद्याच्या दरात साधारणत: ऑगस्ट महिन्यात चढ-उतार होत असतो. कर्नाटक, आंध्र या ...

Onion is getting bad due to occasional rains | अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे कांदा होतोय खराब

अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे कांदा होतोय खराब

googlenewsNext

चौकट-

नैसर्गिक आपत्ती, परराज्यातील कांदा उत्पादन यानुसार आपल्याकडील कांद्याच्या दरात साधारणत: ऑगस्ट महिन्यात चढ-उतार होत असतो. कर्नाटक, आंध्र या राज्यांमध्ये नवीन पीक येण्याच्या काळात असलेली नैसर्गिक स्थिती याचाही कांदा दरावर परिणाम होत असतो. मागील महिन्यात अधिकाधिक असणारा दर या महिन्यात कमीत कमी इतका झाला आहे. एक महिन्यात कांदा दरात ५०० ते ६०० रुपयांनी वाढ झालेली आहे. यामुळे आता मिळणारे सरासरी दरही चांगले असल्याचा दावा केला जात आहे.

कोट-

सध्या बाजारात येणारा माल थोडा हलक्या प्रतीचा असला तरी त्याची मागणी कायम आहे. अनेक शेतकऱ्यांना कांदा निवडून चांगला माल साठवून ठेवला आहे. जो अतिरिक्त माल आहे तोच सध्या बाजारात येत आहे. सध्या बांगलादेशची निर्यातही खुली झालेली आहे. मात्र, ज्यांच्याकडे साठवणुकीची व्यवस्था आहे ते शेतकरी कांदा विक्रीची घाई करीत नाहीत ज्यांच्याकडे अशी सोय नाही तेच शेतकरी सध्या बाजारात माल आणत आहेत. - नरेंद्र वाढवणे, सचिव, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती

कोट-

सध्या कांद्याची मागणी आणि पुरवठा स्थिर आहे. देशांतर्गत कांद्याला चांगली मागणी आहे. लॉकडाऊनमुळे गिऱ्हाइकी काहीशी कमी झाली होती; पण आता निर्बंध शिथिल झाल्याने मागणी वाढू लागली आहे. यावर्षी अधूनमधून पडणारा पाऊस आणि सदोष बियाणामुळे कांदा खराब होण्याचे प्रमाण अधिक आहे. भविष्यात पुरवठा कमी पडला तर दरामध्ये फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. - नितीन जैन, कांदा व्यापारी, लासलगाव

Web Title: Onion is getting bad due to occasional rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.