कांदा उत्पादकांचा आता हमीभावासाठी लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 06:44 PM2021-03-15T18:44:25+5:302021-03-15T18:45:23+5:30

लासलगाव : महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली कांद्याला किमान प्रति किलो ३० रुपयाचा दर मिळावा यासाठी ह्यआपला कांदा आपलाच भावह्ण या मोहिमेचा शुभारंभ सोमवारी येथील बाजार समितीत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

Onion growers now fight for guarantees | कांदा उत्पादकांचा आता हमीभावासाठी लढा

कांदा उत्पादकांचा आता हमीभावासाठी लढा

Next
ठळक मुद्देलासलगाव येथून मोहिमेचा शुभारंभ : प्रति किलो ३० रूपये दर देण्याची मागणी

लासलगाव : महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली कांद्याला किमान प्रति किलो ३० रुपयाचा दर मिळावा यासाठी ह्यआपला कांदा आपलाच भावह्ण या मोहिमेचा शुभारंभ सोमवारी येथील बाजार समितीत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

कांद्याच्या प्रति एकराच्या उत्पादनास ६५ ते ७० हजार रुपये खर्च येत असताना दरवर्षीच एक दोन महिन्याचा अपवाद वगळता राज्यभरातील सर्वच बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असतो. सोबतच बेमोसमी पाऊस, गारपीट, अतिवृष्टी, बोगस कांदा बियाणे तर कधी कधी दुष्काळ अशा विविध कारणांनी शेतातच कांद्याचे मोठे नुकसान होत असते.

या सर्व संकटावर मात करून मोठ्या कष्टाने कांद्याचे उत्पादन घेतल्यानंतर शेतकऱ्यांना बाजार समितीत उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असल्याने नेहमीच आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. यावेळी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे महेश ठाकरे, सोमनाथ गिते, विलास दौंड, रवींद्र पगार, गौरीलाल पाटील,सजन सानप, वाळीबा गायकवाड आदी शेतकरी उपस्थित होते. 

केंद्र सरकारकडे देणार अहवाल
केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या धरसोड वृत्तीमुळे जागतिक बाजारपेठेमध्ये भारतीय कांद्याला कायमस्वरूपी हक्काची बाजारपेठ मिळवणे आजपर्यंत शक्य झालेले नसून देशात कांद्याचे ठोस असे कुठलेही धोरण ठरलेले नाही याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यात व देशात ह्यआपला कांदा आपलाच भावह्ण या मोहिमेअंतर्गत कांद्याला किमान ३० रुपये प्रति किलोचा भाव निश्चित करून द्यावा यासाठी राज्य व केंद्र सरकारकडे मागणी केली जाणार आहे. त्यासाठी राज्यभरातील सर्वच प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांदा उत्पादकांसोबत व इतर राज्यातील कांदा उत्पादकांसोबत या अभियान अंतर्गत संपर्क करून सरकारकडे शेतकऱ्यांच्या कांद्याला ३० रुपये प्रति किलो दर देणे जरूरी असल्याबाबत सविस्तर लेखी मागणीचा अहवाल दिला जाणार आहे.

देशात प्रत्येक गोष्टीचा दर हा उत्पादक हेच ठरवत असताना यापूर्वी कांदा उत्पादक असंघटित होते. म्हणून कांदा दराच्या बाबतीत आजपर्यंत अभ्यासपूर्ण व सातत्यपूर्ण लढा उभा राहिला नाही. परंतु महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यातील कांदा उत्पादक आता संघटित होत असून सरकार कांद्याला किमान ३० रुपये प्रति किलोचा दर देत नाही तो पर्यंत हा लढा अविरतपणे सुरूच ठेवतील.
-भारत दिघोळे, अध्यक्ष, कांदा उत्पादक शेतकरी संघटना
 

Web Title: Onion growers now fight for guarantees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.