पूरग्रस्तांसाठी कांद्याची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 01:17 AM2019-08-14T01:17:27+5:302019-08-14T01:17:52+5:30
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी देवळा तालुका शिवसेनेच्या वतीने कांद्याने भरलेली पिकअप गाडी मदत म्हणून पाठविण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुनील पवार, देवळा शहरप्रमुख मनोज अहेर यांनी दिली आहे.
देवळा : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी देवळा तालुका शिवसेनेच्या वतीने कांद्याने भरलेली पिकअप गाडी मदत म्हणून पाठविण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुनील पवार, देवळा शहरप्रमुख मनोज अहेर यांनी दिली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत देवळा तालुका शिवसेनेने पूरग्रस्तांना मदत म्हणून कांदा पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी कांदा संकलित केला. देवळा बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्यांनी प्रत्येकी ५० किलो कांद्याची मदत दिली. मंगळवारी दुपारी कांद्याने भरलेली पिकअप गाडी शिवसेनेच्या नाशिक येथील शिवसेनेच्या मदत केंद्राकडे रवाना करण्यात आली आहे.
यावेळी उपशहरप्रमुख विश्वनाथ गुंजाळ, नईम तांबोळी, गट संघटक भाऊसाहेब चव्हाण, भाऊसाहेब अहेर, युवा सेनेचे सुनील चव्हाण, सतीश आहेर, गणप्रमुख भास्कर पवार, तात्या पवार, योगेश पवार, शाखाप्रमुख आबा बोरसे, विलास शिंदे, विजय आहेर, जितेद्र भामरे, कौतिक निकम, खंडू जाधव, भास्कर आहिरे, बबन आहेर आदी शिवसैनिक उपस्थित होते .
****कांद्याचे बाजारभाव वाढू लागले असून, देवळा बाजार समितीत १५०० रु पये प्रतिक्विंटल असे दर असतानाही शेतकºयांनी पूरग्रस्तांना कांद्याची मदत केली. आर्थिक संकटात सापडलेले असतानाही शेतकºयांनी आपला माणुसकीचा धर्म जपला आहे. (फोटो १३ देवळा)
फोटो - देवळा तालुका शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी कांद्याने भरलेली पिकअप पाठविण्यात आली. त्याप्रसंगी तालुकाप्रमुख सुनील अहेर, मनोज अहेर, विश्वनाथ गुंजाळ, नईम पठाण आदींसह शिवसेनेचे कार्यकर्ते.