कांदा आवक घटली, दरात अल्पशी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:11 AM2021-06-10T04:11:55+5:302021-06-10T04:11:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमराणे : येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत उन्हाळी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उमराणे : येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत उन्हाळी कांद्याची आवक निम्म्याने घटली असून, मागणी व पुरवठा याचे प्रमाण व्यस्त झाल्याने बाजारभावात दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ झाली आहे.
बाजार समितीत सर्वोच्च २३८१ रुपये दराने कांदा विक्री झाला. दोन दिवसांपूर्वी सोमवारी ( दि.७) येथील स्व. निवृत्ती काका देवरे बाजार समितीत व खारीपाडा येथील रामेश्वर कृषी बाजारात तीन हजार पाचशे वाहनांमधून सुमारे सत्तर हजार क्विंटल आवक झाली होती. परिणामी अचानक आवक वाढल्याने बाजारभावात दीडशे ते दोनशे रुपयांची कृत्रिम घसरण होत सर्वोच्च २१०० रुपये दराने कांदा विक्री झाला होता, तर सरासरी दरातही मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. झालेली घसरण बघता कांदा विक्रेत्या शेतकऱ्यांनी काहीअंशी कांदा विक्री थांबविली आहे. परिणामी येथील बाजार समितीत सोमवारच्या तुलनेत निम्म्याने आवक घटली आहे. आवक घटताच बाजारभावात पुन्हा दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ झाली आहे. बाजार आवारात ७३३ ट्रॅक्टर व ३१५ पिकअप वाहनांमधून सुमारे १७ हजार क्विंटल आवक झाल्याचा अंदाज असून, बाजारभाव कमीत कमी १००१ रुपये, जास्तीत जास्त २३८१ रुपये, तर सरासरी १८०० रुपये दराने व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी केला.
इन्फो
लासलगावी २२९१ रुपये भाव
लासलगाव : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत १४५१ वाहनांतील २७ हजार ९५९ क्विंटल उन्हाळ कांदा विक्री झाला, तर सर्वाधिक भाव २२९१ रुपये जाहीर झाला. १४२५ वाहनांतील २७ हजार ४९१ क्विंटल कांदा व्यापारी वर्गाने ६०० ते २२९१ व सरासरी १८१५ रुपये दराने, तर नाफेडकरिता व्हेफकोने २० वाहनांतील ३६० क्विंटल कांदा १८२६ ते २२६१ व सरासरी २००१ या दराने, तसेच कृषी साधना शेतीमाल उत्पादक संस्थेने सहा वाहनांतील १०८ क्विंटल कांदा १९६१ ते २२८१ व सरासरी २०११ रुपये प्रतिक्विंटल भावाने खरेदी केला.