वणीत कांदा दरात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 01:01 PM2019-11-27T13:01:42+5:302019-11-27T13:01:49+5:30
वणी : येथील उपबाजारात बुधवारी कांदा दरात घसरण झाली.
वणी : येथील उपबाजारात बुधवारी कांदा दरात घसरण झाली. २९ वाहनातुन ४५० क्विंटल कांद्याची आवक झाली. सात हजार रु पये कमाल, ५५०० किमान तर ६५५० रु पये सरासरी असा प्रति क्विंटल चा भाव मिळाला. परराज्यातील कांदा स्पर्धेत दरात घसरण झाली. गुजरात व राजस्थान राज्यातील कांदा बाजारात आल्याने कांद्याच्या मागणीत घट झाल्याने कांद्याचे दर घसरले आहे. गुजरात राज्यात भावनगर व महुआ या दोन प्रमुख शहरामधे मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादीत होतो तसेच राजकोट या शहरी भागातील कांदा बाजारात आला आहे. संपुर्ण गुजरात राज्याची कांद्याची गरज भागवुन सध्या हा कांदा महाराष्ट्रात मुंबई व पुणे या मोठ्या शहरात दाखल झाला आहे. मुंबई ते गुजरात हे अंतरराष्ट्रीय मार्गामुळे सोयीचे आहे. त्यामुळे गुजरातच्या कांद्याला मागणी वाढली आहे. दळणवळण अंतर व वेळेचा समन्वय वाहतुक खर्च या बाबीही खरेदी विक्र ीच्या निकषावर अवलंबुन असल्याने त्याचाही विचार व्यवहार प्रणाली पुर्ण करताना होत आहेत. राजस्थान व हरियाणाच्या सीमेवर असलेल्या अल्वर या ठिकाणाहुन दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान या राज्यांमधे कांदा विक्र ीसाठी व्यापारी घेऊन जात आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे घाऊक कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना पर्याय निर्माण झाला आहे त्यामुळे कांदा दरात घसरण झाल्याची माहिती देण्यात आली.