कांदा दरात हजार रूपयांची तेजी, मात्र आवक वाढताच पुन्हा भाव घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 02:47 PM2017-12-07T14:47:24+5:302017-12-07T14:47:33+5:30
लासलगाव - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांद्याच्या दरात दोन दिवसात हजार रु पयांची तेजी दिसून आली. ओखी वादळाचा पट्टा मुंबईहून सुरतकडे सरकल्याने जिल्ह्यासह परिसरामध्ये पावसाचे आगमन झाले. या ढगाळ वातावरण आणि पावसामुळे राज्यासह , कर्नाटक, आंध्रप्रदेशसह गुजरातमधील काढणीला आलेल्या नवीन लाल कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण देशातून सध्या कांद्याला मोठी मागणी होत आहे. त्यात अचानक पुरवठा कमी झाल्याने कांद्याने चांगलीच उसळी घेतली आहे.

कांद्याचे निर्यात मूल्य वाढवल्याने मागील आठवड्यात कांद्याच्या सरासरी भावात क्विंटल मागे १२०० रु पयांची घसरण झाली. भावातील घसरण लक्षात घेऊन भाव आणखी कोसळतात की या भीतीने शेतकºयांनी कांदा विक्र ीसाठी बाजार आवारामध्ये गर्दी करत होते, मात्र गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसामुळे कांद्याची आवक कमी प्रमाणात आल्याने अचानक ही भाव वाढ झाली आहे .मात्र पुन्हा कांद्याची आवक जास्त प्रमाणात येण्यास सुरु वात झाल्यावर बाजारभाव खाली येतील असे बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी सांगितले .
आज लासलगाव बाजार सामितित लाल कांद्याची १४५० वाहनांची आवक होऊन कांद्याला सकाळच्या
सत्रात जास्तीजास्त ४०१२ रु पये , सरासरी ३५५ रु पये तर कमीतकमी दोन हजार रु पये प्रति क्विंटलला भाव मिळाला .मात्र दुपारच्या सत्रात कांद्याची आवक वाढल्याने कांद्याच्या सरासरी दरात पुन्हा ७०० रु पयांची घसरण दिसून आली. तर कांद्याला सरासरी २८०० रु पये प्रति क्विंटल भाव मिळाला.