चांदोरी येथे वाघ महाविद्यालयातऑनलाईन माजी विद्यार्थी मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 06:09 PM2020-12-22T18:09:40+5:302020-12-22T18:10:29+5:30

चांदोरी : के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय, चांदोरी येथे मंगळवारी (दि.२२) ऑनलाईन माजी विद्यार्थी मेळावा ह्यसुवर्ण स्मृतीह्ण संपन्न झाला.

Online Alumni Meet at Wagh College at Chandori | चांदोरी येथे वाघ महाविद्यालयातऑनलाईन माजी विद्यार्थी मेळावा

चांदोरी येथे वाघ महाविद्यालयातऑनलाईन माजी विद्यार्थी मेळावा

googlenewsNext
ठळक मुद्दे१६० पेक्षा अधिक माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमासाठी ऑनलाईन उपस्थिती

चांदोरी : के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय, चांदोरी येथे मंगळवारी (दि.२२) ऑनलाईन माजी विद्यार्थी मेळावा ह्यसुवर्ण स्मृतीह्ण संपन्न झाला.

सदर मेळाव्यास ४२६ माजी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन लिंकद्वारे नोंदणी केली. तर १६० पेक्षा अधिक माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमासाठी ऑनलाईन उपस्थिती लावली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला के. के. वाघ शिक्षण संस्था गीताची चित्रफित प्रदर्शित करण्यात आली. ज्याद्वारे महाविद्यालयाचे अनेक उपक्रमांचे फोटोसह प्रदर्शन करण्यात आले. त्यानंतर वरिष्ठ महाविद्यालयांचे समन्वयक डॉ. व्ही. एम. सेवलीकर यांनी संस्थेच्या सुवर्णमयी वाटचालीचे कथन पीपीटीद्वारे माजी विद्यार्थ्यासमोर केले.

त्यानंतर महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. आर. के. दातीर यांनी महाविद्यालयाची वाटचालीविषयी माहिती दिली. त्यानंतर माजी विद्यार्थी सतिश खरात, रिंकू राजोळे, तुषार पठाडे, ऋषिकेश खालकर, विशाल पगारे, साक्षी बर्वे, सुवर्ण ढिकले, कोमल भोसले, रोहित धारराव, मोहिनी सितान आदींनी मनोगत व्यक्त केले.
महाविद्यालयाच्या विभागप्रमुख प्रा. बी. बी. चौधरी, डॉ. एच. टी. वाघमारे, प्रा. के.एल. जगझाप यांनी आपल्या शाखेकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस. व्ही. भंडारे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. बी. के. बैरागी यांनी केले.

ऑनलाईन मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी डॉ. व्ही. एम. सेवलीकर, डॉ. एन. एस. पाचोरकर, डॉ. आर. के. दातीर, डॉ. एस. व्ही. भंडारे, प्रा. आर. बी. पोटे, प्रा. बी. के. बैरागी, प्रा. एस. आर. अस्वले, प्रा. एम. एन. धीवर, प्रा. के. एल. जगझाप, प्रा. बी. बी. कोल्हे, डी. ए. भावसार, व्ही. एस. कोकाटे, के. पी. शिंदे, एम्.डी. शिरसाठ आदींचे सहकार्य लाभले. 

Web Title: Online Alumni Meet at Wagh College at Chandori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.