बीएड प्रवेशासाठी ८, ९ जूनला आॅनलाइन सीईटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:17 AM2019-06-04T00:17:47+5:302019-06-04T00:19:55+5:30
बीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली असून, २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षासाठी यंदा आॅनलाइन सीईटी घेण्यात येणार आहे. येत्या ८ व ९ जूनला ही प्रवेश परीक्षा होणार असून, या परीक्षेसाठी नाशिकमधील दोन हजार ते एकवीसशे अर्जांसह राज्यभरातून सुमारे ३७ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत.
नाशिक : बीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली असून, २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षासाठी यंदा आॅनलाइन सीईटी घेण्यात येणार आहे. येत्या ८ व ९ जूनला ही प्रवेश परीक्षा होणार असून, या परीक्षेसाठी नाशिकमधील दोन हजार ते एकवीसशे अर्जांसह राज्यभरातून सुमारे ३७ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत.
गेल्या वर्षी सीईटी परीक्षेसाठी राज्यभरातून सुमारे ३८ हजार अर्ज प्राप्त झाले होते. त्या तुलनेत यावर्षी जवळपास एक हजार अर्जांनी घट झाली आहे. विद्यार्थ्यांचा शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाकडे घटलेला कल लक्षात घेऊन विविध महाविद्यालयांनी प्रवेश परीक्षेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे व त्या माध्यमातून महाविद्यालयांचीही विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, यासाठी विविध संस्थांच्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुविधा व मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे.
नाशिकमध्ये बीएडच्या जवळपास १७५० जागा उपलब्ध आहेत, तर सीईटीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही जवळपास उपलब्ध जागांच्या तुलनेत सारखीच असल्याने सीईटी देणाºया बहुतांश विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होण्याचे संकेत आहेत. दरम्यान, सीईटीनंतर विद्यार्थ्यांनी आपल्याच महाविद्यालयात प्रवेश घ्यावा यासाठी विविध संस्थांनी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचे आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत.