ऑनलाइन झालेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते अविनाश भावसार होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्या डॉ. लीना पांढरे, प्रा. भास्कर नरवटे, प्रा. प्रकाश वारकरी आदी उपस्थित होते. यावेळी भावसार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वांनी आचरणात आणण्याची तीव्र गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज उत्तम संघटक, व्यवस्थापक, मार्गदर्शक होते. गागाभट मूळचे पैठणचे होते. मात्र काशी तीर्थस्थानी निवासास होते. शिवरायांचा राज्याभिषेक करण्यासाठी ते काशीहून प्रथम नाशिकला आले. नाशिकच्या पालखीने त्यांचे स्वागत केले. त्या पालखीसोबत ते रायगडावर गेले व शिवरायांचा राज्याभिषेक केला. प्राचार्य लीना पांढरे यांनी शिवाजी महाराज, त्यांची गरुड भरारी व त्यांचे अजोड कार्य याबाबत मार्गदर्शन केले. प्रा. नरवटे यांनी प्रास्तविक केले. प्रा. वारकरी यांनी आभार मानले.
नाशिकरोड महिला महाविद्यालयात ऑनलाइन राज्याभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:17 AM