सटाण्यात आॅनलाइन वसंत व्याख्यानमाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 06:57 PM2020-08-24T18:57:18+5:302020-08-24T18:57:18+5:30
सटाणा : येथील स्व. वसंतराव दगाजी पाटील ट्रस्टच्या वतीने मंगळवारपासून (दि. २५) दोनदिवसीय आॅनलाइन वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी दिली.
सटाणा : येथील स्व. वसंतराव दगाजी पाटील ट्रस्टच्या वतीने मंगळवारपासून (दि. २५) दोनदिवसीय आॅनलाइन वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी दिली.
गेल्या चौदा वर्षांपासून शहरात अव्याहतपणे सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेत कोरोना महामारीच्या काळातदेखील खंड पडून न देता सलग १५व्या वर्षीही व्याख्यानमाला अखंड सुरू ठेवण्याचा मानस डॉ. पाटील यांनी व्यक्त केला आहे. व्याख्यानमालेचे पुष्प तीन दिवस विद्यावाचस्पती विवेक घळसासी गुंफणार आहेत. मंगळवारी (दि. २५) सायंकाळी ६ ते ८ वाजेदरम्यान पहिले पुष्प अलौकिक योगीअरविंद, बुधवारी (दि. २६) दुसरे पुष्प श्रीरामांनी दिलेला सक्सेस मंत्र, तर गुरुवारी (दि. २७) तिसरे पुष्प ’आता करोनासह जगायचे’ या विषयावर गुंपणार आहेत. रसिकांनी घरी बसून झूम अॅपद्वारे व्याख्यानमालेत सहभागी होण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे .