गोंदेश्वर रोटरी क्लबतर्फे शिक्षकांसाठी आॅनलाइन प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 02:56 PM2020-08-04T14:56:20+5:302020-08-04T14:56:58+5:30
सिन्नर: शिक्षण विभागाने केलेल्या शाळा बंद मात्र शिक्षण सुरू’ या घोषवाक्याला उभारी देण्यासाठी सिन्नरच्या रोटरी क्लब गोंदेश्वरने शिक्षकांना आॅनलाईन प्रशिक्षण देण्यासाठी पाऊल उचलले आहे.
सिन्नर: शिक्षण विभागाने केलेल्या शाळा बंद मात्र शिक्षण सुरू’ या घोषवाक्याला उभारी देण्यासाठी सिन्नरच्या रोटरी क्लब गोंदेश्वरने शिक्षकांना आॅनलाईन प्रशिक्षण देण्यासाठी पाऊल उचलले आहे.
रोटरी क्लब टेक’ या कार्यक्रमाअंतर्गत शिक्षकांना सहाय्यभूत ठरतील अशी कौशल्य विकसित करण्यासाठी ९ आॅगस्ट पर्यंत रोटरी क्लब डिजिटल कौशल्य प्रशिक्षण घेणार आहे. पाच दिवसांच्या या प्रशिक्षण सत्रात १५ माहिती-तंत्रज्ञान कौशल्यांची ओळख शिक्षकांना करून दिली जाणार आहे. रोज तीन याप्रमाणे कौशल्य शिक्षकांत विकसित केली जाणार आहेत. सहाव्या दिवशी पाच दिवसाच्या प्रशिक्षणावर आधारित छोटी चाचणी घेतली जाईल. सहभागी शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाईल. आगामी काळ हा दूरस्थ शिक्षणाचा काळ आहे. शिक्षक बंधू भगिनींना या संधीचा लाभ घेऊन सदर प्रशिक्षणात भाग घेऊन तंत्रस्रेही व्हावे, असे आवाहन रोटरी क्लबतर्फे प्रोजेक्ट चेअरमन बाळासाहेब सदगीर ,अध्यक्ष महेश र्बोहाडे , सचिव अनिल गोर्डे यांनी केले आहे.