आज केवळ कोरडी रंगपंचमी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 11:55 PM2021-04-01T23:55:37+5:302021-04-02T01:46:18+5:30
नाशिक- कोरोना संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने रंगपंचमी निमित्त सार्वजनिक उत्सवावर बंदी घातल्याने यंदा रंग फिके पडणार आहेत. पारंपरिक रहाडी यंदा उघडण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे यंदा मर्यादित स्वरूपात कोरडाच रंग अधिक खेळला जाणार आहे.

नाशिकमध्ये रंगपंचमीचा उत्साह काही औरच असतो. रंगाची उधळण असतेच परंतु रहाडी हे खास वैशिष्ट्य असते. नाशिक शहरात तांबट लेन, तिवंधा चौक, दिल्ली दरवाजा आणि शनी चौक ही गावठाणातील स्थाने त्यासाठी प्रसिद्ध आहेत. तीन ते चार दिवस अगोदरच रहाडी खोदल्या जातात आणि नंतर त्या स्वच्छ केल्यानंतर रंगपंचमीला मानकऱ्यांच्या हस्ते पूजा केली जाते. नैसर्गिक रंग हे या उत्सवाचे वैशिष्ट्य असते. त्यामुळे रहाडी हे खास आकर्षण असतेच परंतु मध्य नाशकात आणि उपनगरातही रेन डान्स देखील जोरात असतात. महापालिकेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर असल्याने यंदा रंगोत्सवात राजकीय नेत्यांचा उत्साह अधिक असला आणि तरूणाईसाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचे नियोजन असले तरी जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातल्याने त्यांचा उत्साह मावळला आहे.
यंदा कोरोनामुळे नाशिकमध्ये उत्सवी थाट नसेल. त्यामुळे मर्यादित स्वरूपातच उत्सव साजरा होणार आहे.