मताधिक्क्यानेच विरोधकांना उत्तर : डॉ. भारती प्रवीण पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 02:23 AM2019-05-24T02:23:58+5:302019-05-24T02:24:17+5:30
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार डॉ. भारती प्रवीण पवार यांनी दोन लाखांच्या फरकाने विजय मिळवित जिल्ह्यातील पहिल्या महिला खासदार म्हणून इतिहासाची नोंद केली. या ऐतिहासिक विजयानंतर त्यांच्याशी साधलेला संवाद...
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार डॉ. भारती प्रवीण पवार यांनी दोन लाखांच्या फरकाने विजय मिळवित जिल्ह्यातील पहिल्या महिला खासदार म्हणून इतिहासाची नोंद केली. या ऐतिहासिक विजयानंतर त्यांच्याशी साधलेला संवाद...
प्रश्न : प्रचंड मताधिक्क्याच्या विजयानंतर काय वाटते?
उत्तर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशात असलेला प्रभाव आणि विकासाच्या मुद्द्यावर जनतेने दिलेला कौल हा महत्त्वपूर्ण ठरला. ही निवडणूक नक्कीच महत्त्वाची होती. मतदारसंघातील जनतेने कोणत्याही अपप्रचाराला महत्त्व न देता मोदी आणि भाजपवर दाखविलेला हा विजय आहे.
प्रश्न : पक्ष बदलाचा हा परिणाम वाटतो?
उत्तर : भाजप आणि मोदी यांचा प्रभाव नक्कीच आहे. देशातील विकासकामे आणि प्रगतिपथावर सुरू असलेली देशाची वाटचाल यावर मतदारांचा विश्वास आहे. तोच विश्वास मतदारांनी आपल्यावरही दाखविला आहे. त्यामुळे विकासाची वाटचाल आपणही सुरूच ठेवू.
प्रश्न : या निवडणुकीत कोणता मुद्दा प्रभावी ठरला असे वाटते?
उत्तर : अर्थातच विकासाचा मुद्दा महत्त्वपूर्ण राहिला आहे. देशाची वाटचाल विकासाकडे होत असल्याचा विश्वास जनतेला वाटतोच, शिवाय मोदी यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास या निवडणुकीत दिसून आला. त्यामुळे मोदींच्या राष्टÑवादाचा मुद्दाही प्रभावी ठरला.