मालेगाव : राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत जवळपास ३८ हजार हेक्टर इतकी विक्रमी फळबाग लागवड झाली आहे. ही समाधानाची बाब असून जिल्ह्यातील शेततळे व फळबाग लागवडीचे उद्दिष्ट विहीत कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. मालेगाव तालुक्यामध्ये या योजनेंतर्गत शेततळे आणि किमान १ हजार हेक्टरवर फळबाग लागवड करण्याच्या सूचना कृषी विभागास देण्यात आल्या.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह, मालेगाव येथे कृषिमंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेततळे, फळबाग लागवड याविषयी चर्चा करण्यात आली. तालुक्यात कृषी विभागाने सन २०२० मध्ये केवळ १०.६० हेक्टरवर लागवड केल्याची, तर २०२१ मध्ये १३८ शेततळे मंजूर असून केवळ २६ कामांना मंजुरी मिळाल्याची माहिती देण्यात आली. मालेगाव तालुक्यामध्ये या योजनेंतर्गत शेततळे आणि किमान १ हजार हेक्टरवर फळबाग लागवड करण्याच्या सूचना कृषी विभागास देण्यात आल्या. येत्या आठ दिवसात सर्व शेतकऱ्यांचे प्रस्ताव तातडीने मंजूर करावेत. चालू हंगामात शेततळ्याच्या पाण्याचा फायदा होईल या दृष्टीने नियोजन करावे. मागील दोन वर्षापासून डाळिंब लागवडी शेतकऱ्यांना गरज असून त्यानुसार लागवड करण्यात यावी.
३८ हजार हेक्टरवर होणार फळबाग लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 1:24 AM
राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत जवळपास ३८ हजार हेक्टर इतकी विक्रमी फळबाग लागवड झाली आहे. ही समाधानाची बाब असून जिल्ह्यातील शेततळे व फळबाग लागवडीचे उद्दिष्ट विहीत कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. मालेगाव तालुक्यामध्ये या योजनेंतर्गत शेततळे आणि किमान १ हजार हेक्टरवर फळबाग लागवड करण्याच्या सूचना कृषी विभागास देण्यात आल्या.
ठळक मुद्देदादा भुसे : शेततळी प्रस्ताव मंजुरीच्या सूचना