विविध प्रशिक्षण वर्गांचे आयोजन
By admin | Published: May 17, 2014 12:04 AM2014-05-17T00:04:58+5:302014-05-17T00:08:08+5:30
नाशिक : बॅँक ऑफ महाराष्ट्रच्या महाबॅँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत आयोजित कुक्कुटपालन या सहा दिवसांच्या प्रशिक्षण.
नाशिक : बॅँक ऑफ महाराष्ट्रच्या महाबॅँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत आयोजित कुक्कुटपालन या सहा दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे दि. १९ पासून मोफत आयोजन करण्यात येत आहे. इच्छुकांनी राहण्याच्या तयारीनिशी दि. १९ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत बॅँक ऑफ महाराष्ट्र जनमंगल बिल्डिंग, तिसरा मजला, टिळकपथ, शालिमार येथे हजर रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ज्यांना उद्योगव्यवसाय करायचा आहे अशांसाठी १२ दिवसांच्या उद्योजकता विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी दि. २१ रोजी सकाळी १० ते २ वाजेपर्यंत मुलाखतीस वरील पत्त्यावर हजर रहावे. सोबत शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, ओळखपत्र, चार फोटो व ७/१२ चा उतारा, अशा मूळ प्रतींसह फोटोकॉफी प्रत आणावी. दि. २६ पासून शेडनेट व पॉलिहाऊसचे सहा दिवसांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. वरील प्रशिक्षण निवास व भोजनादी व्यवस्थेसह पूर्णत: मोफत आहे. तसेच प्रशिक्षणामध्ये व्यवसायाला लागणार्या सर्व कायदेशीर बाबी, मार्केटिंग व व्यवस्थापन, भांडवल उपलब्ध करून घेण्यासंबंधी विविध शासकीय योजना व त्यांचे लाभ तसेच बॅँकेच्या कर्जाबद्दल व प्रकल्प अहवाल तयार करणे याबाबत मार्गदर्शन दिले जाईल.