मेड इन मालेगाव फेस्टिव्हलचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:11 AM2017-11-28T00:11:57+5:302017-11-28T00:12:04+5:30
शहर व तालुक्यातील विविध प्रकारच्या उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे व उत्पादित झालेल्या उत्पादनांचा प्रचार व प्रसार व्हावा या हेतूने दि. २६ ते ३० जानेवारी २०१८ दरम्यान मेड इन मालेगाव फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार आसिफ शेख यांनी दिली. शहरातील दरेगाव शिवारातील रिलायबल इस्टेट येथील १० एकर क्षेत्रावर हे फेस्टिव्हल भरविण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. मालेगाव शहरात रंगीत साडी, रुमाल, शर्टचे कापड, महिलांचे ड्रेस, अगरबत्ती अशा १०२ प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती केली जाते.
मालेगाव : शहर व तालुक्यातील विविध प्रकारच्या उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे व उत्पादित झालेल्या उत्पादनांचा प्रचार व प्रसार व्हावा या हेतूने दि. २६ ते ३० जानेवारी २०१८ दरम्यान मेड इन मालेगाव फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार आसिफ शेख यांनी दिली.
शहरातील दरेगाव शिवारातील रिलायबल इस्टेट येथील १० एकर क्षेत्रावर हे फेस्टिव्हल भरविण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. मालेगाव शहरात रंगीत साडी, रुमाल, शर्टचे कापड, महिलांचे ड्रेस, अगरबत्ती अशा १०२ प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती केली जाते. तसेच शहराला खाद्यसंस्कृतीचा मोठा वारसा आहे. महिला बचत गटाच्या सदस्या विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करीत असतात. शाकाहारी, मांसाहारी खाद्यपदार्थांना मागणी असते. या वस्तूंचे व खाद्यपदार्थांचे या फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शन केले जाणार आहे. तसेच शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. शहर व तालुक्यातील उद्योजकांना मोठे मार्केट उपलब्ध व्हावे यासाठी मुंबई, सुरत, औरंगाबाद, इंदूर येथील उद्योजकांना निमंत्रित करून त्यांना मालेगाव शहरात उत्पादित झालेल्या वस्तूंची व मालाची माहिती दिली जाणार आहे. या फेस्टिव्हलसाठी विविध क्षेत्रातील दोनशे सदस्यांची समिती गठित करण्यात आली आहे. राष्टÑीय व सामाजिक एकोपा वाढीस लागावा म्हणून या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आल्याचे आमदार शेख यांनी सांगितले. मालेगाव शहरातील दरेगाव शिवारातील रिलायबल इस्टेट येथील १० एकर क्षेत्रावर मेड इन मालेगाव फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येणार आहे. मालेगाव शहरात रंगीत साडी, रुमाल, शर्टचे कापड, महिलांचे ड्रेस, अगरबत्ती अशा १०२ प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती केली जाते.