..अन्यथा कोविड सेंटरमध्ये दाखल करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 01:10 AM2021-05-15T01:10:07+5:302021-05-15T01:10:32+5:30

कोरोना संसर्गाचा प्रसार कमी होण्यासाठी आणि गृहविलगीकरणात आवश्यक सुविधा उपलब्ध नसतील अशा बाधित व नव्याने बाधित झालेल्या रुग्णांना गृहविलगीकरणाची परवानगी न देता त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात यावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.

..Otherwise enter the Covid Center! | ..अन्यथा कोविड सेंटरमध्ये दाखल करा!

..अन्यथा कोविड सेंटरमध्ये दाखल करा!

Next
ठळक मुद्देभुजबळ : निफाडसह येवला तालुक्याचा घेतला आढावा

येवला : कोरोना संसर्गाचा प्रसार कमी होण्यासाठी आणि गृहविलगीकरणात आवश्यक सुविधा उपलब्ध नसतील अशा बाधित व नव्याने बाधित झालेल्या रुग्णांना गृहविलगीकरणाची परवानगी न देता त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात यावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.
येवला विश्रामगृहात कोरोना सद्य:स्थिती, उपाययोजना व लसीकरण मोहीम याबाबत निफाड व येवला तालुक्यांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री भुजबळ बोलत होते. कोरोनाच्या प्रादुर्भावासोबतच म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्णदेखील अधिक प्रमाणात आढळून येत आहेत. याकरिता कोरोनाबाधित व कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी म्युकरमायकोसिस या आजारापासून स्वत:ची अधिक प्रमाणात काळजी घ्यावी. 
येवला तालुक्यात कान, नाक व घसा तज्ज्ञ नसल्याने म्युकरमायकोसिसचे बाधित  रुग्ण आढळल्यास त्यांना तातडीने नाशिकला उपचारासाठी पाठविण्यात यावे. त्याचप्रमाणे लासलगाव येथील कोविड सेंटर तातडीने सुरू करण्यात यावे.  नगरपालिकेने पावसाळ्याच्या अनुषंगाने आवश्यक असलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना भुजबळ यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. दरम्यान, भुजबळ यांनी शहरात प्रत्यक्ष पाहणी करत निर्बंधांचाही आढावा घेतला. 
विंचूरला कोविड सेंटरचे लोकार्पण 
विंचूर येथील देवकी लॉन्स येथे उभारण्यात आलेल्या ५० बेडच्या कोविड केअर सेंटरचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद‌्घाटन करण्यात आले. या कोविड केअर सेंटरमध्ये एकूण २५ ऑक्सिजन व २५ साधारण बेड्सची व्यवस्था करण्यात आलेली असून, रुग्णांना आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत.

Web Title: ..Otherwise enter the Covid Center!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.