८५ वर्षाच्या बाधिताची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 06:23 PM2021-04-12T18:23:39+5:302021-04-12T18:24:31+5:30
वणी : ८५ वर्षाच्या वृद्ध व्यक्तीवर लक्ष देऊन केलेल्या उपचारावर मात करण्यासाठी नाशिकच्या कोवीड सेंटरने आपले दायीत्व निभावले आहे. सुमारे २१ दिवस वणी येथील भवरीलाल भाटी हे कोरोनाचा सामना करत होते.
वणी : ८५ वर्षाच्या वृद्ध व्यक्तीवर लक्ष देऊन केलेल्या उपचारावर मात करण्यासाठी नाशिकच्या कोवीड सेंटरने आपले दायीत्व निभावले आहे. सुमारे २१ दिवस वणी येथील भवरीलाल भाटी हे कोरोनाचा सामना करत होते.
एकीकडे कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे तरुण, वृद्ध व महीला यांना आपले प्राण गमवावे लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अनेकांनी मोठी आर्थिक तरतुद करुनही अद्यावत खासगी रुग्णालयात उपचार घेऊनही त्यांचे प्राण वाचु शकले नाहीत अशाही बाबी निदर्शनास आल्या आहेत. जिल्हा रुग्णालयातील कोवीड सेंटरमधे बाधितांच्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडतो व अपेक्षित सेवा मिळत नाही अशीही ओरड होते. मात्र या बाबीला छेद देत ८५ वर्षाच्या वृद्ध व्यक्तीवर लक्ष देऊन केलेल्या उपचारावर मात करण्यासाठी नाशिकच्या कोवीड सेंटरने आपले दायीत्व निभावले आहे.
सुमारे २१ दिवस वणी येथील भवरीलाल भाटी हे कोरोनाचा सामना करत होते. वारकरी संप्रदाय, स्वाध्याय, धार्मिक कार्यक्रम व राजस्थानी भजनी मंडळ व इतर धार्मिक कार्यक्रमात सदोदीत अग्रभागी असलेले भवरीलाल यांची आर्थिक परिस्थीती तशी बेताचीच. भवरीलाल यांनी २१ दिवस संघर्ष करुन कोरोनावर मात केली. व त्यांनी जिल्हा रुग्णालयातील कोवीड सेंटरच्या सर्व स्टाफचे मनापासुन आभार व्यक्त केले.