ओझर पोलीस ॲक्शन मोडमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 02:58 PM2021-05-14T14:58:32+5:302021-05-14T14:58:39+5:30
ओझर : शहरात ठिकठिकाणी कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी व्हावी. नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
ओझर : शहरात ठिकठिकाणी कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी व्हावी. नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यादरम्यान, विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या, दुचाकी सैरावैरा पळवणाऱ्या रिकामटेकड्यांवर आता कारवाई केली जात आहे. ओझरमधील बऱ्याच भागात पोलिसांनी दंडुक्याचा प्रसाद देत अनेक नागरिकांना घरचा रस्ता दाखवला. गुरुवारी सकाळी गडाख कॉर्नर येथे असलेल्या नागरिकांना पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी अनावश्यक फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी लाठीचा प्रसाद देत घरचा रस्ता दाखविला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक गणपत जाधव, बालकदास बैरागी, विजय गायकवाड, अंबादास गायकवाड, नितीन करंडे, इम्रान खान, अनुपम जाधव, अरुण गायकवाड, नितीन तेलंगे, अमोल सूर्यवंशी, भूषण शिंदे आदी कर्मचारी उपस्थित होते.