पंचायत समिती सदस्य सोमनाथ जोशी यांची एकलव्य कोविड सेंटरला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 11:01 PM2020-10-05T23:01:56+5:302020-10-06T01:14:58+5:30

नांदूरवैद्य : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पाशर््वभूमीवर इगतपुरी पंचायत समितीचे सदस्य जोशी यांनी भावली येथील एकलव्य कोविड सेंटरला भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला.

Panchayat Samiti member Somnath Joshi visits Eklavya Kovid Center | पंचायत समिती सदस्य सोमनाथ जोशी यांची एकलव्य कोविड सेंटरला भेट

एकलव्य कोविड सेंटरला भेट देत आढावा घेतांना पंचायत समितीचे सदस्य सोमनाथ जोशी समवेत कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. खतेले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. एम. देशमुख, घोटी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे आदी.

Next
ठळक मुद्देआरोग्य व्यवस्थेचा आढावा

नांदूरवैद्य : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पाशर््वभूमीवर इगतपुरी पंचायत समितीचे सदस्य जोशी यांनी भावली येथील एकलव्य कोविड सेंटरला भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. नाशिक जिल्ह्यात इगतपुरीसह इतर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना रु ग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनातर्फेमिशन झीरो अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सदस्य जोशी यांनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रांना भेट देत नागरिकांशी संवाद साधला. व मिशन झीरो साठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
इगतपुरी तालुक्यातील भावली येथील एकलव्य कोविड केअर सेंटरला भेट देऊन येथील सुखसुविधांची पाहणी करून तेथील रूग्णांशी, वैद्यकीय अधिकारी, पारिचारिका आणि कर्मचारी यांच्याशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढवले. तसेच रूग्णांचे म्हणणे ऐकूण त्यांच्या सुचनांप्रमाणे डॉक्टरांशी समन्वय करून त्याच ठिकाणी त्यांच्या सुचनांचे निरसन केले. पंचायत समितीचे सदस्य सोमनाथ जोशी यांनी कर्मचारी यांच्याशी संवाद साधला.
या आढावा भेटीप्रसंगी घोटी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. एम.देशमुख, कोविड सेंटर प्रमुख डॉ. खतेले, मच्छिंद्र दोंदे, शाम निसरट आदी उपस्थित होते.

प्रतिक्रि या...
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मिशन झीरो अभियान राबविण्यात येत आहे. कोरोनाच्या संकटात स्वत:चे आरोग्य धोक्यात घालून अतिशय चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या कोविड योद्धयांचा मला अभिमान वाटतो आहे. स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या.
- सोमनाथ जोशी, सदस्य, पंचायत समिती इगतपुरी.

 

 

Web Title: Panchayat Samiti member Somnath Joshi visits Eklavya Kovid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.