शहरं
Join us  
Trending Stories
1
"रावसाहेब दानवेंना मुख्यमंत्री करा", युवकाने रक्ताने लिहिले पंतप्रधानांना पत्र
2
महायुतीचे ठरले! अखेर ‘या’ तारखेवर शिक्कामोर्तब; पंतप्रधान मोदी शपथविधीला राहणार उपस्थित
3
काळजीवाहू CM एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले...
4
काँग्रेसची कठोर भूमिका! बेशिस्त वर्तन खपवणार नाही, पक्ष प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई
5
"ज्यांना कुणाला वाटते, त्यांनी ईव्हीएम हॅक करून दाखवावे"; दानवेंचं जानकरांना खुलं आव्हान
6
“पक्षाने फक्त तिकीट दिले, सभा-सामग्री नाही, वाऱ्यावर सोडले”; काँग्रेस उमेदवाराचा आरोप
7
“काळजीवाहू CM संकल्पनाच नाही, राज्यात राष्ट्रपती राजवटीची स्थिती”; वकिलांचे कायद्यावर बोट!
8
“एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
9
VIDEO: अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न; तरुणाला लोकांनी पकडून केली मारहाण
10
"...तर आम्ही आपल्या विरोधात उमेदवार देणार नाही"; दिल्ली CM आतिशी यांची भाजप नेत्याला अनोखी ऑफर
11
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
12
'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा
13
'जय' हो..! पाक 'हायब्रिड मॉडेल'साठी 'कबूल'; आता कसं भारत म्हणेल तसं! पण ठेवल्या या २ अटी
14
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
15
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
16
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
17
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
18
"बांगलादेशातील हिंदूंसाठी लवकरात लवकर..."; केंद्र सरकारला संघाचं मोठं आवाहन
19
"अमित शाह यांनी गुन्हा नाही तर केजरीवालांना..."; भाजपाच्या आरोपावर संजय सिंह यांचा पलटवार
20
IND vs PAK : युवीची कार्बन कॉपीच! Nikhil Kumar ची बॅट तळपली; तो आउट झाला अन् मॅच फिरली

दहशत : दुचाकीस्वारांचा होतो पाठलाग, अनेक मेंढपाळांचे स्थलांतर

By admin | Published: January 10, 2015 11:17 PM

मांगबारी घाट, बिबट्या अडवितो वाट

पिळकोस : राज्य महामार्ग क्र मांक १७ वरील सटाणा मार्गावरील मांगबारी घाटात बिबट्याची दहशत पसरली असून, रात्रीच्या वेळी घाटातून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना यामुळे धडकी भरत आहे. घाटात बिबट्या आपली वाट अडवितो की काय, अशी भीती दुचाकीस्वारांमध्ये व्यक्त होऊ लागली असून, अनेकवेळा रात्रीच्या वेळी प्रवास करणे टाळले जात असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान या भागात पिंजरा लावण्याच्या मागणीकडे वन विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. खामखेडा गावाच्या उत्तरेस थेट मोकभणगीपर्यंत तब्बल ३०-३५ डोंगर असून, चंदननळी, मेंगदर, फांगदर, वाकड्या, बुटीचे रान, शिंपल्या तसेच लोहरदरे अशी नावे असलेली मोठी डोंगररांग येथे आहे. या डोंगरांवर आजही अनेक जंगली स्वापदांचे वास्तव्य आहे. मागील सहा वर्षांपासून या डोंगररांगेत सुमारे आठ ते दहा बिबट्यांचा वावर असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. मागील दोन महिन्यांपासून डोंगर परिसर, आजूबाजूचा शेतशिवार आणि मांगबारी घाटात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. संध्याकाळच्या वेळेस घाटातून प्रवास करताना अनेक वाहनधारकांना बिबट्याचे दर्शन होत असते. ऐन घाटात बिबट्या दिसल्याने वाहनचालकांची त्रेधा उडते. निवाणे येथील बाजीराव तुकाराम अहेर हा तरुण रात्री १० वाजेच्या सुमारास सटाणा येथून घरी पतत असताना मांगबारी घाटाच्या पायथ्याला अचानक बिबट्याच्या डरकाळीने तो घाबरला. परिणामी त्याचा मोटारसायकलवरील ताबा सुटून मोठा अपघात झाला. या अपघातात सदर तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी अवस्थेतही सदर तरुण वाघ वाघ असे शब्द उच्चारत असल्याचे सांगण्यात येत आहे. घाटात सतत बिबट्या आढळत असून, दुचाकीस्वारांसह इतर वाहनांचाही बिबट्या पाठलाग करत असल्याचे प्रत्यक्षदर्शी वाहनधारकांनी सांगितले. घाटात बिबट्याच्या मुक्त संचारामुळे वाहधारकांमध्ये भीती पसरली असून, पिंजरा लावण्याच्या मागणीकडे वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थ व वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. संध्याकाळ झाली की बिबट्या घाटात येत असल्यामुळे जिवावर बेतण्यापेक्षा परिसरातील ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी मांगबारी घाटातून मार्गक्रमण करणे बंद केल्याचे दिसून येत आहे. बिबट्याच्या संचारामुळे पशुपालकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. नागरिकांना रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे जिकिरीचे झाले आहे. घाटाच्या परिसरात जवळच डोंगररांगा असल्याने बिबट्याला लपण्यासाठी चांगली सोय आहे. दिवसा डोंगरांमध्ये वास्तव्य करून बिबट्या रात्रीच्या वेळी शेतमळ्यांमध्ये आणि घाटात मुक्त फिरत असल्यामुळे ग्रामस्थ धास्तावले आहेत. मेंढपाळ तसेच पशुपालकांना तर बिबट्याचे सतत दर्शन होत असते. त्यामुळे जनावरे सांभाळण्याची कसतर त्यांना करावी लागत आहे. अनेक मेंढपाळांनी या परिसरातून स्थलांतर केले आहे. बिबट्या जेरबंद करणे हे देवळा वन विभागासमोर आव्हान ठरले आहे. गेल्या दोन तीन दिवसापासून बिबट्याचे दिवसाही दर्शन होत असल्याने या भागात वन विभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी नानाजी मोरे, संतोष मोरे, शांताराम जाधव, युवराज शिंदे, डॉ. श्यामसुंदर जाधव, डॉ. जितेंद्र अहेर, राहुल सूर्यवंशी, देवीदास गांगुर्डे, श्रीधर वाघ आदिंसह ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)