पेन्शनर्स विचारणा पिंपळगावच्या सभेत मोदींना जाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 05:50 PM2019-04-13T17:50:41+5:302019-04-13T17:52:19+5:30

पेन्शनवाढ, कोशाहारी अहवालाची अंमलबजावणीचे आश्वासनाला भुलून २०१४ साली देशातील तब्बल ६३ लाख पेन्शनरांनी आपले मतदान केल्याचे यावेळी बैठकीत सांगण्यात आले

Panthers ask for Modi at Pimpalgaan rally | पेन्शनर्स विचारणा पिंपळगावच्या सभेत मोदींना जाब

पेन्शनर्स विचारणा पिंपळगावच्या सभेत मोदींना जाब

Next
ठळक मुद्दे ‘नो कोशाहारी, नो वोट’ ही भूमिका मांडणार गांधीगीरी मार्गाने फलक झळकावणार

नाशिक : भाजपाने सत्तेत येण्यापुर्वी २०१४च्या निवडणूकीत इपीएफ ९५ पेन्शनरांना भगतसिंग कोशाहारी अहवालानुसार दरमहा तीन हजार अधिक महागाई भत्ता देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच सत्तेत येताच तीन महिन्यांत पेन्शनमध्य वाढ करण्याचेही सांगितले होते; मात्र या दोन्ही आश्वासनांचा भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विसर पडल्याने येत्या २२ एप्रिलला होऊ घातलेल्या पिंपळगावच्या सभेत मोदी यांना या फसवणूकीचा जाब विचारण्याचा निर्धार जिल्ह्यातील पेन्शनर्स संघटनेने बैठकीत केला.
पेन्शनवाढ, कोशाहारी अहवालाची अंमलबजावणीचे आश्वासनाला भुलून २०१४ साली देशातील तब्बल ६३ लाख पेन्शनरांनी आपले मतदान केल्याचे यावेळी बैठकीत सांगण्यात आले. आयटक कामगार कें द्र, सीबीएस येथील मेघदुत संकुलातील कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पिंपळगाव येथे मोदी यांची सभा होणार आहे, या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. सभेच्या ठिकाणी सेवानिवृत्त साखर कामगार, वीज कामगार, एस.टी, एचएएल, एफसीआय, औद्योगिक कामगार, विडी कामगार, सहकारी संस्था आदि अस्थापनांमधील पेन्शनर्स मंडळी गांधीगीरी मार्गाने फलक झळकावून टोप्या घालत आमची फसवणूक केल्यामुळे ‘नो कोशाहारी, नो वोट’ ही भूमिका मांडणार असल्याचे यावेळी राजू देसले, सुधाकर गुजराथी, सुभाष काकड, विलास विसपुते, डी.बी.जोशी आदिंनी सांगितले.
--

Web Title: Panthers ask for Modi at Pimpalgaan rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.