शैक्षणिक शुल्काच्या सक्तीमुळे पालकांचा प्राचार्यांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 03:25 PM2020-09-03T15:25:18+5:302020-09-03T16:09:31+5:30
कंधाणे : बागलाण तालुक्यातील एका खाजगी शिक्षण संस्थेने चालू शैक्षणिक वर्षाची फि भरण्यासाठी सक्ती केली असुन फी न भरल्याने अनेक विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षणापासुन वंचित ठेवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार पालक अनुभवत आहेत. याबाबत संबधित पालकांनी एकत्र येत प्राचार्यांना जाब विचारत घेराव घातला. संबंधितांनी समर्पक उत्तर न दिल्याने पालकांनी या शाळेवर कार्यवाही व्हावी यासाठी बागलाणचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
लोकमत न्युजनेटवर्क

बागलाण तालुक्यातील एका इंग्रजी माध्यमातील शाळेने विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क आकारणीचा तगादा लावला आहे. शुल्क न भरल्यास संस्थेकडून आॅनलाईन शिक्षणाला मुकावे लागेल असे सांगितले असुन शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी स्थापन केलेल्या ग्रूपवर फी भरण्या संदर्भात पोस्ट केल्या जात आहेत. ज्या पालकांनी अदयापपर्यंत फी भरण्यासाठी प्रतिसाद दिला नाही त्यांना आॅनलाईन शिक्षणापासुन वंचित केले गेले आहे. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहाता शासनाने विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आॅनलाईन शिक्षणाचा पर्याय सुचविला होता. यानुसार तालुक्यातील बºयाच शाळांनी आॅनलाईन शिक्षण सुरू केले आहे बागलाण एज्युकेशन इंग्लिश मेडियम स्कूल शाळेत ही विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षण उपलब्ध करून दिले आहे पण गेल्या दोन दिवसापूर्वी फी बाकीचेचे कारण देत आॅनलाईन शिक्षण बंद केले आहे. सध्या तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला असल्यामुळे येथील सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. सर्वांनाच आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. यातच या शिक्षण संस्थेने चालू शैक्षणिक वर्षाची फि भरण्यासाठी तगादा लावल्याने नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. शासनाच्या अध्यादेशानूसार आगामी वर्षाची फी जमा करण्याची सक्ती करू नये व लॉगडाऊन कालावधी संपल्यानंतर फी जमा करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. असे असताना या शाळेकडून शुल्क भरण्याची सक्ती का? असा सवाल संबंधितांना विचारत जाब विचारला, परंतु प्राचार्यांनी संस्थेच्या कार्यकारी मंडळास विचारून कार्यवाही करू असे उत्तर दिले. या उत्तराने समाधान न झाल्याने अखेर गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर पंकज सोनवणे, महेंद्र खैरनार, नितीन अमृतकार, शशीकांत बिरारी, वैभव मेतकर, सुनिल ठोके, सचिन सोनवणे, पुनम निकम, दिलीप बिरारी, हेमंत बिरारी, अजय बिरारी यांच्या स्वाक्षरी आहेत. (फोटो०३कंधाणे)