नाशिकच्या जिल्हा न्यायालयातील नव्या जागेत वकिलांसाठी वाहनतळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:43 PM2018-03-01T12:43:17+5:302018-03-01T12:43:17+5:30

नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाला पोलीस प्रशासनाच्या ताब्यातील अडीच एकर जागेचा ताबा देण्यात आला

Parking for advocates in the new premises of District Court of Nashik | नाशिकच्या जिल्हा न्यायालयातील नव्या जागेत वकिलांसाठी वाहनतळ

नाशिकच्या जिल्हा न्यायालयातील नव्या जागेत वकिलांसाठी वाहनतळ

Next
ठळक मुद्दे नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाला पोलीस प्रशासनाच्या ताब्यातील अडीच एकर जागेचा ताबा देण्यात आला

नाशिक : उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाला पोलीस प्रशासनाच्या ताब्यातील अडीच एकर जागेचा ताबा देण्यात आला आहे. या नव्या जागेचा न्यायालयासाठी वाहनतळ म्हणून वापर केला जाणार आहे. यासाठी जुन्या सीबीएसमधून पोलीस वसाहतीकडे जाणारा रस्ता खुला केला जाणार आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाला अपुºया जागेमुळे विविध अडचणींचा सामना पक्षकारांसह वकिलांना करावा लागत होता; मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे जागेचा प्रश्न निकाली निघाला आहे. वाहनतळाच्या अडचणीवर मात होणार असून, पोलिसांच्या ताब्यातील अडीच एकर जागेचा ताबा मिळाल्यानंतर न्यायालयासाठी वाहनतळाची व्यवस्था त्या जागेत केली जाणार आहे. गेल्या महिन्यात न्यायालयाला सदर जागेचा ताबा मिळाला आहे.
या नव्या जागेत न्यायालये सुरू करण्यात येणार असली तरी सुरुवातीला वकिलांसाठी वाहने लावण्यासाठी नव्या जागेची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार वकिलांनी जुन्या सीबीएसमधून या जागेत वाहने उभी करावी, असे आवाहन नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केले आहे. यामुळे न्यायालयाच्या मुख्य आवारातील वाहनतळावर येणारा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

Web Title: Parking for advocates in the new premises of District Court of Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक