ओझरटाऊनशिप : मुंबई आग्रा महामार्गावरील बसस्थानक सुरू होण्याच्या प्रतिक्षेत तर जुने बसस्थानक खाजगी वाहनधारकांचे पार्किंग तळ बनले आहे. शौचालय व स्वच्छतागृहात जाण्यासाठी मोकळी वाट नसते त्यामुळे वाट काढीत जावे लागते.नाशिककडून पिंपळगांव बाजूकडे व पिंपळगांव कडून नाशिककडे जाणाऱ्या बहुतेक बसेस ओझर बसस्थानकात येतच नाही आणि नाशिकहुन येतांना पिंपळगांव बस वगळता बहुतेक बस मध्ये कंडक्टर कडून नकार दिला जातो. त्या मुळे सिटी बसेस व इतर तुरळक बसेस येण्यासाठी वापर होतो सकाळ संध्याकाळ तर वाहनेच पार्क. केलेली आढळतात असे अनेकांनी सांगितले.नवीन बसस्थानक सुसज्ज असले तरी परवानगीच्या प्रतिक्षेत अडकून पडल्याची चर्चा आहे प्रभूधामकडे नवीन बसस्थानकात जाण्यासाठी आग्रारोडला कट नाही की लांबपल्त्याच्या येणाºया-जाणाºया महामंडळाच्या बसला नासिककडून जाणाºया बस वगळता विमानगरजवळ तर पिंपळगावकडून नाशिकला जाणाºया बसला टर्नमारून, एचएएलच्या मुख्यगेटच्या अंडरपासने बसस्थानकावर जावे लागेल.गांवासाठी बसथांबा हा धन्वंतरी हॉस्पीटल ते गडाखकॉर्नर सिर्वसरोडलगत केला तरच ओझरगावातील उपनगरातील लोकांनाही सोयीचे होईल. महामार्ग पूर्णत्वावर येईल तेव्हा अंडरपासने बसस्थानकावर फिरून यावे लागेल ट्राफिक जामचा प्रश्न उद्भवेल.सध्या ओव्हरब्रीजचे काम जलद गतीने सुरू आहे. यात ओझर बसस्थानकाच्या समोरील बाजुने बससाठी युटर्न मारून प्रवाशांना येजा करण्यास बसस्थानक योग्य राहिल त्यासाठी विमाननगर येथेच अंडरपास हवा अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.सीटी बसची कपात झाल्यामुळे लाबपल्याच्या महामंडळाच्या बससाठी प्रवाशांना रोडवर उभे रहावे लागते, नवीन बस स्थानकावर एसटी बस थांबल्या तर प्रवासी सुखावतील.आम्ही एस टी महामंडळाला बसपास काढतांना अॅडव्हान्स पैसे भरतो, पण टाऊनशिप ओझरमार्गे नाशिकला जाणारी सिटी बसही उपनगरातील बसथांब्यावर न थांबता पुढे जातात.विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजसाठी जाण्यास उशीर होतो, यामुळे घरातुन खुप अगोदर निघावे लागते. हीच गत त्यांची घरी परततांना होते. याचबरोबर बºयाचदा सकाळी ९ नंतर येणाºया बस एकामागुन एक काहीही अंतर न ठेवता ये जा करीत असतात सद्यातरी खाजगी वाहनांसाठी वाहनतळ बनले असल्याचे निर्दर्शनास येत आहे. बसस्थानक स्थलांतरानंतर तरी अनेक प्रश्र मार्गी लागो हीच अपेक्षा नागरीक व्यक्त करीत आहेत..
ओझर गांवातील बसस्थानक बनले पार्किंग तळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 6:03 PM
ओझरटाऊनशिप : मुंबई आग्रा महामार्गावरील बसस्थानक सुरू होण्याच्या प्रतिक्षेत तर जुने बसस्थानक खाजगी वाहनधारकांचे पार्किंग तळ बनले आहे. शौचालय व स्वच्छतागृहात जाण्यासाठी मोकळी वाट नसते त्यामुळे वाट काढीत जावे लागते.
ठळक मुद्देविमाननगर येथेच अंडरपास हवा अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.