मनमाड स्थानकात खोळंबले प्रवासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2022 11:43 PM2022-04-03T23:43:15+5:302022-04-03T23:44:32+5:30
मनमाड : मध्य रेल्वेच्या मनमाड ते इगतपुरी या अतिशय व्यस्त असलेल्या लोहमार्गावर देवळाली ते लहवित स्थानका दरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनल कुर्ला ते मुझफ्फरपूर पवन एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणावर ठप्प झाली.
मनमाड : मध्य रेल्वेच्या मनमाड ते इगतपुरी या अतिशय व्यस्त असलेल्या लोहमार्गावर देवळाली ते लहवित स्थानका दरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनल कुर्ला ते मुझफ्फरपूर पवन एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणावर ठप्प झाली. या अपघातामुळे मुंबईहून भुसावळकडे जाणाऱ्या डाऊन मार्गाच्या अनेक गाड्या रेल्वे स्थानकावर खोळंबून होत्या, तर लांब पल्ल्याच्या काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
अपघाताचे वृत्त मनमाड येथे येताच मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकातून अपघातग्रस्त यातायात ट्रेन घटनास्थळी मार्गस्थ झाली. त्याचबरोबर मनमाड रेल्वे रुग्णालयाचे वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. दरम्यान, अनेक गाड्या विलंबाने धावत असल्याने उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख जंक्शन स्थानक असलेल्या मनमाड रेल्वे स्थानकात प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात घडला.
पवन एक्सप्रेस इगतपुरी येथून सुटल्यानंतर नाशिक - मनमाडकडे येत असताना लहवित ते देवळाली रेल्वे स्थानक दरम्यान पवन एक्सप्रेसचे काही डबे रुळावरून घसरून मोठा अपघात घडला. अपघात घडताच मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकात धोक्याचा इशारा देणार सायरन वाजविण्यात आले. त्यानंतर मनमाड रेल्वे जंक्शन परिसरात कार्यरत असलेली अपघात रिले ट्रेन व वैद्यकीय पथक मनमाड येथून घटनास्थळी मार्गस्थ झाले.
या अपघातामुळे मुंबईहून मनमाडकडे येणाऱ्या डाऊन मार्गावरील अनेक गाड्या अनेक रेल्वे स्थानकांमध्ये खोळबंल्या होत्या. त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक विस्कळित झाले. या अपघातामुळे काही गाड्या रद्द केले, तर काही गाड्यांचे मार्ग वळविण्यात आले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिलcent