बालपणापासूनच कुस्तीची आवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 10:13 PM2020-02-01T22:13:31+5:302020-02-02T00:18:49+5:30
सातवी इयत्तेत असल्यापासून शाळेत मुलांशी स्वत:हून कुस्ती खेळायचो, मस्ती करायचो. यातूनच मला कुस्ती खेळायची प्रचंड आवड निर्माण झाली. तालमीत जावेसे वाटले; पण आर्थिक परिस्थिती नव्हती. मात्र वडिलांनी मला बाहेर पाठविण्याचे धाडस दाखविले. त्यामुळे आपण महाराष्टÑ केसरी झाल्याचे प्रतिपादन हर्षवर्धन सदगीर यांनी केले.
सिन्नर : सातवी इयत्तेत असल्यापासून शाळेत मुलांशी स्वत:हून कुस्ती खेळायचो, मस्ती करायचो. यातूनच मला कुस्ती खेळायची प्रचंड आवड निर्माण झाली. तालमीत जावेसे वाटले; पण आर्थिक परिस्थिती नव्हती. मात्र वडिलांनी मला बाहेर पाठविण्याचे धाडस दाखविले. त्यामुळे आपण महाराष्टÑ केसरी झाल्याचे प्रतिपादन हर्षवर्धन सदगीर यांनी केले.
सिन्नर तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात हर्षवर्धन सदगीर यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सदगीर बोलत होते. बालपण व प्राथमिक शिक्षण कोंभाळणे येथे पूर्ण झाल्यानंतर भगूर येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण करीत असतानाच बलकवडे व्यायामशाळेत कुस्तीचा सराव केल्याचे त्यांनी सांगितले. दहावीत असतानाच पहिले गोल्ड मेडल मिळविल्याची आठवण सदगीर यांनी सांगितली.
विद्यार्थ्यांनी मेहनत घ्यावी
नॅशनल गोल्ड मेडल, महाराष्ट्राचा केसरी पहिला मानकरी ठरल्याचे सांगत सध्या हरसूल महाविद्यालयात एम.ए. पहिल्या वर्षात शिक्षण घेत असून, ओपन स्पर्धेमध्ये खेळण्याचा सराव सुरू असल्याचे सांगितले. तसेच कॉमन वेल्थ स्पर्धेमध्ये, यानंतर आॅलिम्पिक स्पर्धेमध्ये तसेच हिंद केसरी खेळण्याची महत्त्वाकांक्षा ठेवून सराव सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सातत्य, जिद्द, मेहनत अंगी बाळगण्याचे आवाहन सदगीर यांनी विद्यार्थ्यांना केले.