नाशिक : पावसाळा संपल्यानंतर हिवाळ्यात उद्भवणाऱ्या ‘स्वाइन फ्लू’ या आजाराची रुग्णसंख्या तब्बल १५० झाली आहे. शहरासह जिल्ह्यात वाढत्या ‘स्वाइन-फ्लू’च्या प्रादुर्भावाबद्दल राज्यस्तरावर चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वीच शहरात वैद्यकीय व्यावसायिकांच्या कार्यशाळा पार पडली. मागील वर्षी हिवाळ्यात केवळ एक रुग्ण आढळून आला होता; मात्र यावर्षी जानेवारीपासून ‘स्वाइन फ्लू’चे रुग्ण आढळून येत आहे.शहरी भागासह जिल्ह्यातही स्वाइन-फ्लू या आजाराने डोके वर काढले आहे. या सात महिन्यात जिल्ह्यात तब्बल ३५ व्यक्ती या आजाराने दगावल्याने या आजाराची स्थिती गंभीर होत चालल्याचे दिसून येते. शासकीय स्तरावरून या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी तसेच प्रादूर्भाव टाळण्यासाठी ६५ हजार लसींची खरेदी राज्यभरात केली जाणार आहे. नाशिकमध्येही यामार्फत मोफत लसीकरण उपलब्ध होणार आहे; मात्र महापालिका आरोग्य विभागाने आलेली मरगळ झटकून शहरातील प्रभागांमध्ये डास निर्मूलन व स्वच्छतेविषयी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. विशेषत: शहरातील गावठाण भाग असलेल्या जुने नाशिक, वडाळागाव, पाथर्डी, द्वारका या परिसरात सार्वजनिक स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहे. दाट लोकवस्तीमुळे या भागात नागरिकांकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते. मागील वर्षी जुलै महिन्यात वडाळागाव भागात थंडी, तापासह सांधेदुखीच्या आजाराने थैमान घातले होते. तब्बल शंभराहून अधिक रुग्ण यावेळी आढळून आले होते.दहा वर्षांत ३७० मृत्युमुखी; दोन हजार पॉझिटिव्हमागील दहा वर्षांमध्ये नाशिक जिल्ह्यात दोन हजार ३१ रुग्ण स्वाइन फ्लूचे पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यापैकी ३७० रुग्ण दगावले; मात्र मागील सहा महिन्यांत यामध्ये मोठी वाढ झाली आहे. सहा महिन्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या ३२ रुग्णांमध्ये १२ महिलांचा समावेश आहे. १६ ते ३५ वयोगटांत अद्याप ५३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या वर्षी १, तर यंदा १५० ‘स्वाइन फ्लू’चे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 1:56 AM
पावसाळा संपल्यानंतर हिवाळ्यात उद्भवणाऱ्या ‘स्वाइन फ्लू’ या आजाराची रुग्णसंख्या तब्बल १५० झाली आहे. शहरासह जिल्ह्यात वाढत्या ‘स्वाइन-फ्लू’च्या प्रादुर्भावाबद्दल राज्यस्तरावर चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वीच शहरात वैद्यकीय व्यावसायिकांच्या कार्यशाळा पार पडली. मागील वर्षी हिवाळ्यात केवळ एक रुग्ण आढळून आला होता; मात्र यावर्षी जानेवारीपासून ‘स्वाइन फ्लू’चे रुग्ण आढळून येत आहे.
ठळक मुद्देवेगाने फैलाव : दहा रुग्ण दगावले